शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 7:09 PM

चिखल तुडवत करावे लागतेय मार्गक्रमण

ठळक मुद्देपाणी, रस्ते, दिव्यांचा अभाव  पाणी साचून तुटतो संपर्कआबालवृद्धांची गैरसोय

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मुकुंदनगर, राजनगरातील नागरिकांचा पावसाळ्यात शहराशी संपर्क तुटतो. शाळकरी चिमुकल्यांना चिखलातून वाट काढीत शाळा गाठावी लागते. तर कामगारांना मुकुंदवाडी रेल्वेगेटच्या अलीकडील परिसरात वाहने उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

शहरालगतच्या नवीन वसाहतीचा मनपात समावेश करून २० ते २५ वर्षांचा कालावधी लोटला. परंतु त्या वसाहतीच्या विकासाकडे स्थानिक प्रशासनाने सतत दुर्लक्ष केले. मुकुंदनगर, राजनगरातून बीड बायपासला जाताना हालहाल होतात, अनेकदा वाहने चिखलात रुतलेल्या अवस्थेत सोडून द्यावी लागतात. त्यामुळे वाहनातील पेट्रोल किंवा इतर साहित्याची चोरीदेखील कायमचीच बाब झाली आहे. मनपाने या भागात गुंठेवारी लावून मुकुंदनगर, राजनगर, मुर्तुजापूर, स्वराजनगर परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. परंतु कुणीही या नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे विष्णू गाडगे, सौरभ सौदे, सुशील भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

चिखलामुळे होते कसरतया परिसरात मनपाची शाळा नाही. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयासाठी पटरीपलीकडे स्वत: नेऊन शाळेत सोडावे लागते. पटरीलगत चालणाऱ्यांना अतिदक्षतापूर्वक ये-जा करावी लागते. अन्यथा अपघाताचे प्रसंगही ओढावले आहेत. पायातील चपला, बूट काढून मुलांना अनवाणी पायाने शाळेपर्यंत न्यावे लागते. ही जीवघेणी कसरत महानगरपालिका केव्हा थांबविणार, असा सवाल शिवाजी जाधव, कृष्णा पवार, सुरेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दूध व गॅससाठी रस्त्यावरचिखलामुळे दूध व गॅस व पाण्याचे जार घेऊन फिरणारी वाहने घरापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यामुळे रेल्वेगेटजवळ डांबरी रस्त्यावर थांबलेल्या वाहनातून साहित्य घेऊन जाण्याची कसरत करावी लागते. मुकुंदनगर व राजनगरला मूलभूत सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कविता कीर्तिशाही, बबिता राठोड, संगीता जाधव आदींनी केली आहे. 

भुयारी रस्ता करावामुकुंदवाडी रेल्वेस्थानक ते राजनगर, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना गेट ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. पादचारी रेल्वेरुळावरून जीवघेणा प्रवास करतात. गंभीर आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका घरापर्यंत जात नाही. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला खांद्यावर उचलून डांबरी रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यामुळे भुयार बनवून रस्ता करावा. -शैलेश भालेराव 

सेवा-सुविधा कोसोदूर परिसरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते किंवा पायपीट करीत शाळा गाठावी लागते. त्यासाठी पालकांना सर्व कामे सोडून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कार्यक्षेत्रात असूनही सेवा-सुविधांपासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्यात आलेले आहे. धोकादायक डीपींना कुंपण लावण्याची गरज आहे.- आशिष चव्हाण

अविकसित परिसरकामगार व मजूर कुटुंबियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, चिखलामुळे रस्त्यावर वाहन चालविता येत नाही. घराजवळ चिखल असल्याने वाहन घरीच ठेवून पायपीट करीत कामावर जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर पावसाळ्यात येते. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्वरित रस्ता, ड्रेनेज, लाईट सेवा मनपाने पुरवाव्यात.- डॉ. सूरज स्वामी 

गैरसोयीत वाढरस्त्याचे सिमेंटीकरण होणार असून, बायपासपर्यंत सोयीचा होणार आहे. परंतु ठेकेदाराने टाकलेल्या खडीमुळे त्यातून वाहनाला वाट काढणे कठीण झाले आहे. दुचाकीने वाट काढता येऊ शकते. परंतु चारचाकी वाहनाला वळसा घेऊनच देवळाई किंवा झाल्टा फाटामार्गे जालना रोडवरून स्वराजनगर, राजनगर, मुकुंदनगर गाठावे लागत आहे. - शेख आक्रम 

डीपीला कुंपण नाहीपरिसरात एकही डांबर व सिमेंट रोड तयार करण्यात आलेला नाही. चिखलमय रस्त्यालगत उघड्या डीपी आहेत. शाळकरी मुले आणि नागरिकांना रस्त्यावरून जाताना धोका होण्याची भीती वाढली आहे. परिसरातील उघड्या डीपीसाठी संरक्षक कुंपण लावण्याची मागणी केली; परंतु त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. - साहेबराव कांबळे

 

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका