डमी कोरोना रुग्ण प्रकरण, पळून गेलेला एक मूळ रुग्ण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 13:30 IST2021-11-18T13:29:19+5:302021-11-18T13:30:08+5:30
पळून गेलेला एक मूळ रुग्ण गौरव गोंविद काथार हा वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

डमी कोरोना रुग्ण प्रकरण, पळून गेलेला एक मूळ रुग्ण पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केंद्रातून बनावट रुग्णांची भरती केल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील मूळ रुग्ण गौरव गाेविंद काथार (रा. म्हाडा कॉलनी, बन्सीलालनगर) याला वेदांतनगर पोलिसांनी पकडून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.
वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'लोकमत'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार पळून गेलेला एक मूळ रुग्ण गौरव गोंविद काथार हा वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप यांनी उपनिरीक्षक सुधाकर पाटील, अंमलदार शिवराज बिरारे व बाळासाहेब ओवांडकर यांचे पथक काथारच्या घरी पाठविले. तो घरातून गायब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने काथार यास मेल्ट्राॅन कोविड केंद्राच्या परिसरातूनच ताब्यात घेत पुढील तपासासाठी एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा शोध एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे हे घेत आहेत.
औरंगाबादेत आढळले कोरोनाचे डमी रुग्ण; १० हजारात रुपयात ठरला सौदा, पॉझिटिव्ह रुग्ण फरार