घरोघरी महालक्ष्मींचे विधिवत पूजन

By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:46:13+5:302014-09-04T00:54:00+5:30

औरंगाबाद : बुधवारी महालक्ष्मींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा करण्यात आली.

Duleep Pooja of the house of Mahalakshmi | घरोघरी महालक्ष्मींचे विधिवत पूजन

घरोघरी महालक्ष्मींचे विधिवत पूजन

औरंगाबाद : बुधवारी महालक्ष्मींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा करण्यात आली. यानिमित्त १६ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. काही परिवारांत दुपारी, तर काही परिवारांनी सायंकाळी जेवणाचे आयोजन केले होते.
महालक्ष्मींसाठी प्रत्येक घरात मोठे मखर उभारण्यात आले होते. विविध पडदे, माळा, रंगीत कागदाचा वापर करून सजावट करण्यात आली होती. मखराच्या वरच्या बाजूला फुलोरा तयार करण्यात आला होता. सोवळ्यात नैवेद्य करण्यासाठी गृहिणी पहाटेच उठून सडा टाकून, रांगोळी काढून कामाला लागल्या होत्या. महालक्ष्मीला १६ प्रकारच्या भाज्या, चटणी, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर सामूहिकरीत्या महालक्ष्मींची आरती करण्यात आली. भोजनासाठी सुवासिनींना आमंत्रण देण्यात आले होते. काही घरांमध्ये सायंकाळी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मींचे आगमन व आज पूजनाने सर्वत्र आनंदी वातावरण होते.

Web Title: Duleep Pooja of the house of Mahalakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.