शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसायावर परिणाम

By admin | Updated: May 26, 2014 00:56 IST

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे.

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी हिंगोली शहरातील जनावरांच्या बाजारात कवडीमोल दरात शेतकरी जनावरे विकत आहेत. दुसरीकडे शेकडा दीड हजार रूपये मोजून कडबा विकत घेवून टाकणे शक्य नसल्याने दुग्ध व्यवसायावर चाराटंचाईचा परिणाम झाला आहे. कृषिप्रधान देशात जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत. प्रतिवर्षी हमखास येणार्‍या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही उत्पादकांना कडब्याचा शोध घ्यावा लागत आहे; परंतु सर्वत्रच चाराटंचाई निर्माण झाल्याने उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातही चारा मिळत नसल्याने जनावरे विकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यातही बाजारात घेवाल नसल्याने जनावरे कवडीमोल दरात विकली जात आहेत. औताव्यतिरिक्त असलेली जनावरे उत्पादकांनी विक्रीस काढली आहेत. पावसाळा जरी तोंडावर आला असला तरी आतापासून चार महिन्यापर्यंत जनावरांना चारा टाकावा लागतो. जोपर्यंत नवीन चारा निर्माण होणार नाही, तोपर्यंत उत्पादकांना चारा विकत घ्यावा लागणार आहे. खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी तडजोड केली असताना कडबा विकत घेवून टाकणे शक्य होणार नाही. त्यामुळे औताव्यतिरिक्त जनावरे विकून शेतकरी मोकळा झाला आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. दुधावर जीवनमान अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दुधाचे पैसे चारा विकत घेण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. अद्याप मान्सूनचा पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो. दुधाळ जनावरांना हिरवा चारा टाकावा लागतो. कडबाच मिळणे दुर्मिळ झाले असताना हिरव्या चार्‍याची गोष्ट लांबचीच आहे. त्यामुळे हिंगोलीत दुग्धव्यवसायिकांची संख्या घटली आहे. आहे त्या व्यावसायिकांनी दूध देणारी जनावरे ठेवली असून उर्वरित जनावरे विकून टाकली आहेत. (प्रतिनिधी)हिंगोली शहरात दूधविक्रेत्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच राहिली आहे. प्रतिवर्षीच्या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय मोडीत काढल्याने हॉटेल्सला तसेच घरोघरी जावून दूध विकणार्‍यांकडून २ हजार लिटरचा पुरवठा होतो; पण शहरात प्रत्येक दिवशी २० हजार लिटरची आवश्यकता पॅकेटच्या दुधावर भागविली जाते. त्यातही शहरात येणारे सर्व पॅकेटचे दूध पश्चिम महाराष्ट्रातील आहे पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली असून उत्पादकांना घ्यावा लागत आहे कडब्याचा शोध दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत