शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

प्रदेशाध्यक्षपद गेल्याने दानवे समर्थकांचे चेहरे उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 1:24 PM

आता राजूरच्या गणपतीऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन 

ठळक मुद्देउमेदवारी मिळण्याबाबत संकट महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले

- विकास राऊत 

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लावत भाजपने त्यांच्याकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी काढून घेतली. महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ती जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पद गेल्यामुळे दानवे समर्थकांचे चेहरे उतरले आहेत. आता समर्थकांनी नूतन प्रदेशाध्यक्षांशी जवळीक असणाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील भाजपचे काही पदाधिकारी कोल्हापूरच्या नेटवर्कमध्ये आहेत, त्यांच्याशी जवळीक साधून विधानसभा व इतर पद पदरात पाडून घेण्याचा विचार काहींच्या डोक्यात घोळू लागला आहे. यापुढे राजूरच्या गणपती ऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाजप पदाधिकारी आवूर्जन जातील.

२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री पद काढून घेत दानवे यांना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली. सुमारे पाच वर्ष ते पदावर राहिल्यामुळे त्यांची पक्ष संघटनेत चांगलीच ‘घडी’ बसली होती. २०१५ च्या मनपा निवडणुकीपासून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातून जे कुणी पक्षात आले, त्यांना राज्यमंत्री दानवे यांनी विधानसभा उमेदवारीसह इतर पदांवर बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. त्या सर्व इच्छुकांचे अवसान मंगळवारपासून गळाले आहे. संघटन सत्तेचे केंद्र मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात सरकल्यामुळे संघटनेतील ‘दादागिरी’ आता संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. फु लंब्री आणि पूर्व मतदारसंघातील इच्छुकांना आता पळता भूई थोडी होणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एक गट दानवे यांच्यासाठीच सक्रीय असायचा. प्रदेशाध्यक्ष संघाच्या मुशीतील असल्यामुळे त्या गटाच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत संघटन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगलेएका पक्षातून उडी मारून भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्री दानवे यांच्या मागे-पुढे करणाऱ्याला एका आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. गेल्या आठवड्यात सदरील इच्छुकाने राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत मुंबईवारी करून पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पदरी निराशा आल्यामुळे सगळा विषय ठप्प झाला. परंतु लायझनिंग करण्यात काही आयाराम (इतर पक्षातून आलेले) तरबेज आहेत. ते आता चतुर्थीच्या दिवशी राजूरच्या गणपतीच्या दर्शनाला जाण्याऐवजी दर पोर्णिमेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण