शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडीयावरील पोस्ट भोवली; औरंगाबाद मनपाच्या सहायक नगर रचनाकारांच्या निलंबनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 14:38 IST

सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी सोशल मीडियावर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून मागील तीन दिवसांपासून महापालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्दे१२ फेब्रुवारी रोजी खरवडकर यांनी आपल्या नावाने फेसबुकवर पोस्ट टाकली होती.या सोशल मीडियावरील पोस्टचे पडसाद गुरुवारी (दि.१५ ) सर्वसाधारण सभेतही उमटले.

औरंगाबाद : सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी सोशल मीडियावर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून मागील तीन दिवसांपासून महापालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सोशल मीडियावरील पोस्टचे पडसाद गुरुवारी (दि.१५ ) सर्वसाधारण सभेतही उमटले. ११ नगरसेवकांनी यावर आपले मत व्यक्त केले. त्यातील नऊ जणांनी खरवडकर यांच्याविरोधात आगपाखड केली. दोन नगरसेवकांनी त्यांची बाजू मांडली. अखेर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी खरवडकर यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

१२ फेब्रुवारी रोजी खरवडकर यांनी आपल्या नावाने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यात ‘नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर ते तत्त्वज्ञानी बनून बेछुट आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात’ असा मजकूर होता. मागील आठवड्यात सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खरवडकर यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. या पाश्वभूमीवर ही पोस्ट टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आयुक्तांनी खरवडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे अधिकार गोठविले होते.

दरम्यान, बुधवारी खरवडकर यांनी आपण ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या वादासंदर्भात केली होती, असा खुलासा केला. त्यांच्या खुलाशानंतर काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले. खरवडकर भाजपचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न काँग्रेसने केला होता. गुरुवारी सर्वसाधारण सभा सुरू होताच खरवडकर यांच्यावर कारवाईची मागणी सुरू झाली. राज वानखेडे, त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, अफसर खान, सोहेल शेख, भाऊसाहेब जगताप, विकास जैन, सुनीता आऊलवार यांनी सभागृहातील सर्वच ११५ नगरसेवकांचा हा अपमान आहे, खुलाशात त्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचाही अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.

एमआयएमचे गंगाधर ढगे यांनी दमडीमहल येथे अतिक्रमणांवर कारवाई केल्याने खरवडकर यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. अय्युब जागीरदार यांनी नमूद केले की, अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक चूक केली असेल तर कारवाई करावी. मात्र, त्यांना टार्गेट करणे चुकीचे आहे. महिला नगरसेविकांनी ‘खरवडकरांचे करायचे काय?.... अशा घोषणा सभागृहात दिल्या. तासाभराच्या  चर्चेनंतर महापौरांनी खरवडकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. आता कारवाईचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात आहे. आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद