शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

दारूला स्पर्शही नसल्याने किनगावात सौख्याची परंपरा...

By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST

संजीवकुमार देवनाळे , किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नाही.

संजीवकुमार देवनाळे , किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांमध्ये सौख्याची परंपरा आजही कायम आहे. किनगाव हे लातूर, परभणी, बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरचे गाव असून, या तिन्ही जिल्ह्यांतील गावांचा थेट संपर्क किनगावाशी येतो. जिल्ह्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्री, बिअर बारच्या दुकानासाठी स्पर्धा लागली असली, तरी किनगावमध्ये मात्र वयोवृद्ध व जाणकार मंडळींनी अद्यापही अवैध दारू विक्रीला गावात येऊ दिले नाही. मधुकर मुंढे यांनी १९७७ ते १९९६ दरम्यान, गावच्या लोकप्रतिनिधींची भूमिका सांभाळली. सलग तीनवेळा ते बिनविरोध सरपंच झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गरीब लोकांसाठी दीडशे घरे बांधून दिली व त्या घरांना ‘ठाकरेनगर’ असे नाव दिले. याच काळात गावाची बाजारपेठ ओळखून उदगीर येथील एका व्यावसायिकाने अवैध दारू विक्रीचे दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळीही गावातील लोकांनी त्याला विरोध करून त्याचा उद्देश हाणून पाडण्याचे काम केले. गावातील सामाजिक कार्याने प्रेरित झालेले मधुकर मुंढे, मैनोद्दीन देशमुख, देवेंद्र आमले यांनी गावात अवैध दारू विक्रीला स्थान देऊ नये, यासाठी त्यावेळी आमरण उपोषण केले. पण; त्यांच्या या सामाजिक कार्याला त्यावेळी दाद ना फिर्याद, अशी परिस्थिती झाली. तरीही जिद्दीने कार्य केल्यामुळे शासनाला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर मात्र कोणी तसा प्रयत्न करण्याचेही धाडस केले नाही. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव... अहमदपूर तालुक्यातील किनगावात आनंदात जगणार्‍या नागरिकांना या अवैध व्यवसायाची दृष्ट लागू नये, या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी किनगाव ग्रामपंचायतीमध्ये बहुमताने दारू विक्री कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच बाहेरील कोणी व्यक्ती या उद्देशाने आला तर त्यालाही ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असाही निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून गावामध्ये सौख्याची परंपरा राबत असून, तीच परंपरा कायम ठेवण्याचे काम माजी सरपंच त्रिवेणी लव्हराळे, शिवाजी कांबळे, लताताई मुंडे आदींनी केली आहे. तसेच यापुढील कालावधीतही ती परंपरा पुढे सांभाळण्याचे काम सरपंच विठ्ठलराव बोडके करीत आहेत.