जिल्हा बँकेत ‘कॅश’ नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित
By Admin | Updated: May 19, 2014 01:02 IST2014-05-19T00:36:50+5:302014-05-19T01:02:40+5:30
पाटोदा: तालुक्यातील हजारो शेतकर्यांचे पीक विमा व गारपिटीचे अनुदान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आले आहेत.
जिल्हा बँकेत ‘कॅश’ नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित
पाटोदा: तालुक्यातील हजारो शेतकर्यांचे पीक विमा व गारपिटीचे अनुदान येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत आले आहेत. मात्र या बँकेस स्टेट बँक आॅफ हैदराबाद मधून पुरेशी रक्कम मिळत नसल्याने डीसीसीतून शेतकर्यांना पैसे मिळत नाहीत. यामुळे शेतकर्यांना बँकेत खेटेही घालावे लागत आहेत. पाटोदा येथे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची खाते असल्याने शेतकर्यांना येथूनच अनुदान व इतर रक्कम दिली जाते. या बँकेतून सध्या गारपीटीचे अनुदान व पीक विम्याची रक्कम दिली जात आहे. यापोटी तब्बल १२ कोटी रुपये येथून वितरित केले जात आहेत. गारपीट अनुदान वितरणाची नऊ गावे आणि साडेपाच हजार लाभार्थी आहेत. तर पीक विम्याची रक्कम तालुक्यातील साडेआठ हजार शेतकर्यांना मिळणार आहे. यामुळे जिल्हा बँकेत पैसे घेण्यासाठी शेतकर्यांची गर्दी होत आहे. या जिल्हा बँकेची ट्रेझरी बँक स्टेट बँक आॅफ हैदराबाद आहे. एसबीएच मधूनच जिल्हा बँकेला पुरेशी रक्कम दिली जाते, मात्र सध्या एस.बी.एच. मधून जिल्हा बँकेला पुरेशी रक्कम दिली जात नसल्याने डीसीसीच्या शाखेतून शेतकर्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. यामुळे अनेकदा शेतकर्यांना खेटेही घालावे लागतात. यामुळे शेतकर्यांची ससेहोलपट होत असल्याने जिल्हा बँकेच्या शाखेला पुरेशी रक्कम देण्याची मागणी आहे. (वार्ताहर) पैसा उपलब्ध होत नसल्याने अडचणी डीसीसी शाखेचे व्यवस्थापक कैलास इंगळे म्हणाले, पुरेसा पैसा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वरिष्ठांना कळविले आहे. पुरेसे संरक्षण नाही एसबीएचमधील अधिकारी जे.एस. उजगरे म्हणाले, पुरेसा संरक्षण मिळत नसल्याने पैसा पुरविला जात नाही.