शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तलवारी उपसण्याचे प्रकार वाढल्याने दहशत

By admin | Updated: December 20, 2015 23:35 IST

वसमत : शहरामध्ये लहानसहान कारणावरून झालेल्या वादात चक्क तलवारी काढण्यापर्यंत मजल जात आहे.

वसमत : शहरामध्ये लहानसहान कारणावरून झालेल्या वादात चक्क तलवारी काढण्यापर्यंत मजल जात आहे. पोलिसांचा धाक व कायद्याची भीती वाटत नसणाऱ्या सटरफटर गुंडांमुळे वसमतमधील शांतता बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वसमत शहरातील मुख्य चौक असलेल्या झेंडा चौकाजवळ चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. भरबाजारात झालेल्या हाणामारीत चक्क तलवारी काढण्याचा प्रकार झाला. तलवारीच्या हल्ल्यात एकजण जखमीही झाला आहे. या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र यातील एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. यापूर्वीही शहरात तलवारी घेऊन हाणामाऱ्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. गुंडांचे टोळके दुचाकीवरून तलवारी घेवून एकमेकांचा पाठलाग करतानाचे चित्र अनेकदा पहावयास मिळते. मात्र गुन्हे दाखल होत नसल्याने किंवा परस्पर प्रकरण मिटविण्यात येत असल्याने पोलिस दफ्तरात असे प्रकार नोंदवले जात नाहीत. परिणामी गुंड टोळक्यांची हिंमत वाढत चालली आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांतील गुन्हे दाखल झाल्यानंतरही तलवारी जप्त होण्याची कारवाई मात्र झाल्याचे समोर येत नाही. अशा प्रकारांतूनच संबंधितांची घातक हत्यारे बाळगण्याची हिंमत वाढत चालली आहे. अनेकदा तर मिरवणुकांमध्येही तलवारबाजीचे खेळ दाखवले जात आहेत. पोलिस बंदोबस्तात निघालेल्या मिरवणुकीत अनेकदा तलवारधारी तरूण जल्लोष करताना पहावयास मिळतात, हे विशेष. ज्या झेंडाचौकात तलवारीने हाणामारीची घटना घडली त्या चौकाशेजारील गल्लीत कायम मटकाचालक व दारूड्यांची गर्दी राहते. भररस्त्यावर उभे राहून दारू पिण्याचे प्रकारही या गल्लीत होत असतात. मात्र बीट जमादार किंवा अधिकारी कधी या भागात फिरकत नाहीत. झेंडा चौकाजवळच दिवसभर मोबाईल मटकाचालक धंदा घेत फिरत राहतो. त्याच्यामागे मटका शौकीनही शेजारच्या गल्लीत बसून आकडे काढत व आकडा येण्याची वाट पाहतात. हे प्रकार खुलेआम सुरू असले तरी एकदाही गणवेशात बीट जमादार फिरकलेले पहावयास मिळत नाहीत. यातूनच मग गंभीर प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)