शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:55 IST2019-02-24T23:55:04+5:302019-02-24T23:55:17+5:30
पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली.

शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत
औरंगाबाद : पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली. जीवन इंदलसिंह जारवाल (वय २५, रा. बेंबळ्याची वाडी) असे मृताचे नाव आहे.
इंदलसिंह जारवाल यांची गेवराई खुर्द शिवारात शेती असून, त्यात मोठे शेततळे आहे. या शेतातच ते सहकुटुंब राहतात. इंदलसिंह यांचा मोठा मुलगा जीवन (२५) रविवारी सकाळी सात वाजता शौचासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे इंदलसिंह जीवनचा शोध घेत शेतात गेले. तेव्हा त्यांना तेथील शेततळ्यात जीवन पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरड करून अन्य शेतकºयांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्याला शेततळ्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जीवनला तपासून मृत घोषित केले.
जीवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी, छोटा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जीवन पाणी घेण्यासाठी शेततळ्यात उतरला, प्लास्टिक पन्नीमुळे पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा अंत झाल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पुंगळे यांनी दिली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.