शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने दुष्काळ

By admin | Updated: August 18, 2015 00:54 IST

लातूर / निटूर : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते़ त्यानुसार त्यांनी मराठवाड्यात लहान-मोठे ३०० प्रकल्प (धरणे) बांधण्याचा निर्णय घेतला होता़

लातूर / निटूर : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते़ त्यानुसार त्यांनी मराठवाड्यात लहान-मोठे ३०० प्रकल्प (धरणे) बांधण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु, प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने धरणे बांधली गेली नाहीत़ त्यामुळे मराठवाड्यात सध्या दुष्काळ पडला आहे़ काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच याला जबाबदार आहे़ त्यांनी जलयुक्त शिवार सारखा एखादा उपक्रम राबविला असता तर मराठवाड्यात दुष्काळ बघण्याची वेळ आली नसती, असा आरोप पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी लातूर जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यात केला. पाणीपुरवठा मंत्री लोणीकर रविवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत़ रविवारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाची पाहणी मुरुड, अकोला, चिंचोलीराव वाडी, वासनगाव, गंगापूर, खंडापूर येथील कामांची पाहणी केली़ त्यानंतर सोमवारी निलंगा तालुक्यातील गौर, आनंदवाडी, तुपडी, दगडवाडी, पानचिंचोली आदी गावांतील पीक परिस्थितीची पाहणीही केली़ यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते़ लोणीकर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने सिंचनाचा एकही प्रकल्प राबविला नाही़ त्यामुळे सध्या मराठवाड्यात दुष्काळ आहे़ या दुष्काळाबाबत शासन गंभीर असून, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी कर्नाटक व मध्य प्रदेशातून चारा मागवू, पाणीटंचाईच्या उपाययोजना शासनाने सुरु केल्या आहेत़ तातडीच्या योजना राबविण्यात येत आहेत़ शासन शेतकऱ्यांसाठी काहीही करण्यास तयार आहे़ त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती पाहण्यासाठी मंत्र्यांचे दौरे आहेत़ लातूर जिल्ह्यातील परिस्थिती बिकट असून, त्यावर मात करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केले असल्याचेही पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य शासन दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे़ रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत़ गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी आपल्या गावात कोणत्या प्रकारची कामे होऊ शकतात किंवा कोणती कामे शिल्लक आहेत़ या कामांची मागणी त्वरित वरिष्ठांकडे करावी, नसता कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असेही पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले़ पाहणी दौऱ्यात खा़डॉ़ सुनील गायकवाड, आ़ सुधाकर भालेराव, माजी खा़रुपाताई पाटील निलंगेकर, माजी आ़पाशा पटेल, गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे आदींचा समावेश होता़