शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

विकासांमुळे माहूरगडचे सौंदर्य फुलले

By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST

ईलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी सुविधांसह संस्थानकडून शहरातील जि़प़ शाळा अंगणवाड्या दत्तक घेवून त्यांची सुधारणा सुरू असून त्या चकाकणार आहेत.

ईलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूरमाहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी सुविधांसह संस्थानकडून शहरातील जि़प़ शाळा अंगणवाड्या दत्तक घेवून त्यांची सुधारणा सुरू असून त्या चकाकणार आहेत. याशिवाय विविध विकास कामांमुळे माहूरगडाचे सौंदर्य चांगलेच फुलत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १८ आॅगस्ट २०१३ पासून श्री रेणुकादेवी संस्थानचा कारभार पाहण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली़ यामध्ये उपविभागीय महसूल अधिकारी अभिजित चौधरी, भवानीदास भोपी, विनायकराव फांदाडे यांचा समावेश आहे. समितीने गडावर भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांसह पिण्याचे पाणी, चेंजरूम, पायऱ्यावर शेडसह उष्णतारोधक रंग रंगोटीसह दर पौर्णिमेला भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था इत्यादी सुविधा दोन वर्षभरात ४ कोटी ८२ लाख १७ हजार ५८० रुपयांची उलाढाल करीत खर्च जाता एसबीआय बँकेत असलेल्या अकाऊंटमध्ये १ कोटी ४० लाख रुपये शिल्लक ठेवण्यात यश मिळविले आहे़ भाविकांच्या सुविधेसाठी पोलिस चौकी बनविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अत्याधुनिक शौचालय बाथरूम, मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व संपूर्ण व्यवहार पावत्या संगणकीकृत करण्याच्या कामाला सुरुवात, मंदिर परिसराला परकोट, संरक्षक भिंतीच्या कामाला व उंबरझरा कुंडाच्या कामाला सुरुवात, चौकात हॉयमास्ट दिव्यांच्या खांबाची उभारणी, पायऱ्यावर दरवाजे गेट बसविण्यात आले तर मंदिरावर आरोग्य सुविधांसाठी अतिदक्षता विभागासह दवाखाना व रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली असून भाविकांना अत्यंत सुलभरित्या दर्शन व्हावे याची दक्षतेने रांगेच्या ठिकाणी मंदिरात भविकांच्या सुरक्षा स सुविधांची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती संस्थानचे कार्यालय अधीक्षक पी़ डी़ चव्हाण यांनी खास लोकमतला दिली़ संस्थानवर १८ आॅगस्ट २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती़ त्याच आदेशानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयाने नवीन आदेश देवून ११ सदस्यीय समिती नेमली़ त्यात अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश उपाध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी, सचिवपदी उपविभागीय महसूल अधिकारी तर कोषाध्यक्ष म्हणून तहसीलदार माहूर यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सात सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ यात चंद्रकांत बाबूराव भोपी, भवानीदास रेणुकादास भोपी, श्रीपाद भार्गवराव भोपी, विनायकराव नारायणराव फांदाडे, आशिष गुणवंतराव जोशी, समीर किरण भोपी, संजय रामभाऊ काण्णव यांची निवड करण्यात आली. सदर निकालाची न्यायालयीन प्रक्रिया सध्यातरी संपुष्टात आली नाही़श्री रेणुकादेवी संस्थानवरील त्रिसदस्यीय समितीने धार्मिक कार्यासह सामाजिक कार्यातही मोठा वाटा उचलून शहरातील ७५० विद्यार्थीसंख्या असलेल्या जि़ प़ कें़ प्रा़ शाळेला ५ लाख रुपये अनुदान देवून रंगरंगोटी बेंच तसेच गेट बसवून दिला असून शहरातील अवकळा आलेल्या तीन अंगणवाड्यांनाही दत्तक घेवून त्यांचेही सुशोभिकरण करून पूर्ण सुविधा पुरविल्याने त्रिसदस्यीय समितीचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जोशी यांनी स्वागत केले़ संस्थानच्या खात्यात १ किलो सोने श्री रेणुकादेवी संस्थानला दानपेटीच्या माध्यमातून ९३ लाख ७४ हजार ४२९ रुपये, पातळ विक्रीतून ५३ लाख ६९ हजार ८९५ रुपये, तांबूल विक्रीतून १ लाख ४७ हजार , पूजाकरातून १ लाख, खन बांगड्या फोटो हर्रासीतून १ लाख २५ हजार, तांदूळ विक्रीतून २५ हजार तसेच भाविकांनी मातेला अर्पण केलेले सोने १ किलो २५१ ग्रॅम, चांदी १९ किलो ३४३ ग्रॅम तर विनापावती परशुराम मंदिराच्या पाळण्याला बांधण्यात आलेली ३ किलो ७६६ गॅ्रम चांदी दान स्वरूपात संस्थानच्या खात्यात जमा करण्यात आली.