पशुधनाची संख्या घटल्याने शेणखतही महागले

By Admin | Updated: June 9, 2014 00:09 IST2014-06-08T23:39:21+5:302014-06-09T00:09:13+5:30

परंडा : तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता.

Due to the decrease in the number of livestock, fertilizers have increased | पशुधनाची संख्या घटल्याने शेणखतही महागले

पशुधनाची संख्या घटल्याने शेणखतही महागले

परंडा : तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यामुळे शेतीसाठीही शेणखताचा वापर होत होता. परंतु, गेल्या काही वर्षांत पशुपालन करण्यासाठी स्वतंत्र मजूर ठेवणे शक्य होत नसल्याने तसेच खर्चही वाढत असल्याने पशुधनाची संख्या कमी होत चालली आहे. पर्यायाने शेणखतही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदा शेणखताचे भाव चांगलेच वधारले आहेत. सध्या १ हजार ४०० रुपयाला एक ट्रॉली शेणखत विकले जात असून, वाहतुकीसाठीही अंतरानुसार ट्रॉलीधारकाकडून दर आकारला जात आहे. याशिवाय मजुरीचे अतिरिक्त पैसेही शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.
पूर्वी घराघरात पशुधनाचा संभाळा केला जात असे. त्यामुळे शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत होते. शेतीमध्ये याचा प्रचंड वापर होत होता. मात्र १९८५ च्या दशकात तालुक्यात हरितक्रांतीचे वारे वाहू लागल्याने शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शासन स्तरावर रासायनिक खताचे पाकीट शेतकऱ्यांना प्रायोगीक तत्वावर पुरवठा केले जाऊ लागले. यामुळे कालांतराने रासायनिक खतांचा वापर वाढला. उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेमध्ये शेतकरीही रासायनीक खताकडे आकर्षिक होत गेला. परंतु, याचा परिणाम जमिनीच्या पोतावर होऊ लागला होता.
दरम्यान, गेल्या दशकात पर्यावरणवाद्यांनी या मुद्यावर जनजागृतीची मोहीम सुरु केली. शेवटच्या घटकापर्यतच्या शेतकऱ्याला सेंद्रीय खताविषयीचे महत्व पटवून देण्यात येऊ लागले. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षात शेतकरी पुन्हा सेंद्रीय शेतीकडे वळू लागला आहे. सेंद्रीय शेतीच्या भरवशावर शेती उत्पादन वाढवून त्यातून आलेला शेतमाल स्वाभिमानाने विकू लागले. यांना बाहेरच्या बाजारपेठेत जाण्याचीही अवशकता भासली नाही. ग्रामीण स्तरावर सेंद्रीय शेतीच्या पिकांना भाव मिळू लागला. शेणखतातून उत्पादीत केलेला माल, असे अभिमानाने सांगणारे शेतकरी दुकानावर दिसू लागले. त्यामुळे पुन्हा शेणखताला जुने वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पाटील म्हणाले. मात्र, शेणखताचा शोध घेण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
तालुक्याच्या ग्रामीण भागात आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. हे शेतकरी दररोज जनावरांचे शेण तसेच मलमूत्र एका विशिष्ट ठिकाणी साठवण करतात. वर्षभर कुजलेले हे शेणखत खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतात फेकण्याचे काम केले जाते. मात्र, दिवसेंदिवस पशुधनात घट होत चालल्याने शेणखताचे भाव आता चांगलेच वधारले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही, असे पशुपालक आपल्याकडील खत इतरांना विकतात. परंडा, तालुक्यात जागेवर शेणखताची १४०० रुपये ट्रॉलीने यंदा विक्री होत आहे.
शेणखताचे फायदे
एक टन शेणखतातून ५.६ किलो नत्र, ३.५ किलो स्फुरद, ७.८ किलो पालाश, १ किलो गंधक, २०० ग्रॅम मगनीज, ८० ग्रॅम लोह, १५.६ ग्रॅम तांबे, २० ग्रॅम बोरॉन, २.३ ग्रॅम मॅलिब्डे नम ही घटकद्रवे मिळतात. या द्रव्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून जमिनीतून सक्षम उत्पन्नाची निर्मिती होते व जमिनीचा क स वाढील लागतो.

Web Title: Due to the decrease in the number of livestock, fertilizers have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.