शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नांमकात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 13:02 IST

नांदूर-मधमेश्‍वर कालव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील सुराळा शिवारात सापडला, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे.

 घटना : एक औरंगाबादचा, दुसरा कोपरगावचा

वैजापूर : नांदूर-मधमेश्‍वर कालव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील सुराळा शिवारात सापडला, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे.लक्ष्मण नामदेव गाडीवान (१९, रा. तळेगाव, ता. कोपरगाव) असे मृत युवकाचे नाव असून, अद्याप शोध न लागलेल्या तरुणाचे नाव अक्षय कर्डिले (रा. औरंगाबाद) असे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथील लक्ष्मण गाडीवान हा युवक तळेगाव शिवारातील नांदूर-मधमेश्‍वर कालव्यात २९ रोजी अंघोळीसाठी गेला होता. त्याचा तोल गेल्याने तो घसरून पडला व कालव्यात वाहून गेला. ३0 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी ७ वाजता तालुक्यातील सुराळा शिवारात त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या एका घटनेत औरंगाबाद येथील अक्षय कर्डिले हा तरुण त्याच्या जोडीदारासह शिर्डी येथे गेला होता. येताना बेलगाव शिवारातील नांदूर-मधमेश्‍वर कालव्याजवळ हात-पाय धुण्यासाठी थांबले होते. यातील एका तरुणाचा तोल गेल्याने तो कालव्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी अक्षय कर्डिले याने प्रयत्न केला; परंतू या घटनेत तोच कालव्यात वाहून गेला. रविवारी ३.३0 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तो वाहून गेल्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अक्षयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नाही