शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

घाटीच्या दारात वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू

By admin | Updated: July 23, 2014 00:42 IST

औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा ‘आधार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या दारातच एका आजारी वृद्ध महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला.

औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा ‘आधार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या दारातच एका आजारी वृद्ध महिलेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून ही वृद्ध महिला घाटीच्या बाह्यरुग्ण विभागासमोर तडफडत पडलेली होती; परंतु कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून घाटी रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात दररोज येणाऱ्या शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अशाच एका गरीब वृद्ध आजारी महिलेला कुणीतरी चार दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये सोडून निघून गेले. ही महिला प्रचंड आजारी होती. उठून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाह्यरुग्ण विभागातही ती जाऊ शकत नव्हती. कुणीतरी येईल अन् आपल्याला उपचारासाठी घाटीत दाखल करील, या आशेने त्या शेडमध्येच ती तडफडत होती. शेकडो नागरिक तेथून ये-जा करीत होते. तिला पाहत होते. विशेष म्हणजे ही महिला ज्या शेडमध्ये पडलेली होती तेथेच घाटी रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी आपली चारचाकी वाहने पार्क करतात. मात्र, डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही त्या महिलेची दया आली नाही. शेवटी उपचार न मिळाल्याने तडफडून या वृद्धेने मंगळवारी प्राण सोडला. ती हालचाल करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घाटी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने एक अनोळखी महिला शेडमध्ये पडली असल्याची माहिती घाटीतील पोलीस चौकीला कळविली. मग पोलिसांनी या महिलेला घाटीत उपचारासाठी आणले. तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. या अनोळखी महिलेच्या मृत्यूची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या महिलेचे प्रेत नेण्यासाठी अद्याप कुणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे प्रेत शवागृहात बेवारस पडून आहे.