शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणी अटळ

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

विठ्ठल फुलारी , भोकर तालुक्यातील किनी परिसरात १९ जूनला पडलेल्या ५५ मि़मी़ पावसाने आता शेतकऱ्यांपुढेच वैताग निर्माण केला आहे़

विठ्ठल फुलारी , भोकरतालुक्यातील किनी परिसरात १९ जूनला पडलेल्या ५५ मि़मी़ पावसाने आता शेतकऱ्यांपुढेच वैताग निर्माण केला आहे़ या पावसानंतर किनी परिसरातील ८० गावांतील शेतकऱ्यांनी कापसाची व सोयाबीनची पेरणी केली खरी, पण यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने या गावांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ शेतकऱ्यांना जवळपास दीड कोटींचा फटका बसणार आहे़आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी भोकर तालुक्यात मोठा पाऊस नाही़ पण किनी परिसरात दि़१९ जूनला ५५ मि़मी़ पाऊस झाला़ यानंतरही पाऊस पडेल या आशेने पाळज, किनी, आमठाणा, नेकली, नसलापूर, मसलगा, दिवशी खु़, दिवशी बु़, कांडली पाकी, महागाव, भुरभूशी गारगोटवाडी, नांदा खु़, मोखंडी तांडा यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली व काही प्रमाणात सोयाबीन पेरली़ पण तेव्हापासून मात्र पावसाचा पत्ताच नाही़ पेरलेल्या बियाणे पैकी कुठे उगवले तर कुठे मातीच्या बाहेर कोंबही आला नाही़ उगवलेल्या रोपट्यालाही आता पावसाच्या सरीची गरज आहे़ पण पाऊसच पडायला तयार नाही़ यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ एकूणच शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पाऊस कधी पडेल, याची चिंता अनेकांना सतावत आहे. सदरील परिस्थितीची पाहणी तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केली आहे़ कृषी कार्यालयामार्फत या परिसरात ३ हजार ८४१ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी यापेक्षा जास्त पेरा झाला असल्याचे शेतकरी म्हणत आहेत़दीड कोटींचा बसणार फटकाकिनी परिसरात झालेल्या कापसाच्या लागवडीवर बियाणे, मजुरी धरून दीड कोटीच्या जवळपास खर्च झाला आहे़ दोन दिवसांत पाऊस न झाल्यास यातील कोणतेच रोपटे जगण्याची शाश्वती नाही़ यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या बियाणावर खर्च केलेल्या दीड कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे़हवामान आधारित पीक विमा योजनेत उडीद, कापूस, मूग व सोयाबीन या पिकाचा समावेश केला आहे़ या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घेण्यासाठी ३० जूनपर्यंत या पिकाचा हप्ता भरावा यासाठी तालुका कृषी कार्यालयासाठी संपर्क साधावा -रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी, भोकरकर्ज काढून, दागिने विकून महागामोलाचे बियाणे काळ्या आईच्या स्वाधीन केले़ पण पावसानेच पाठ फिरविल्याने हे बियाणे आता वाया जाणार आहेत़ पोटाला चिमटा देवून केलेल्या कापसाच्या लागवडीकडे पाहून डोळ्यात अश्रू येतात़ हे अश्रू आता कोणाला कळतील -शंकरराव देशमुख, विठ्ठल बत्तलवाड (शेतकरी, देवठाणा)