औषध निर्माण अधिकाऱ्यांचा संप
By Admin | Updated: June 29, 2014 00:26 IST2014-06-29T00:05:08+5:302014-06-29T00:26:39+5:30
परभणी : शासकीय औषध निर्माता कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने ३० जूनपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे़

औषध निर्माण अधिकाऱ्यांचा संप
परभणी : शासकीय औषध निर्माता कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने ३० जूनपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे़
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने लागू केलेली वेतनश्रेणी अद्यापही राज्य शासनाने लागू केली नाही़ यासाठी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले होते़
त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते़ मात्र अद्यापपर्यंतही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही़ त्यामुळे २५ जून रोजी संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले होते़ तरी शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे़
त्यामुळे ३० जून रोजी औषध निर्माण अधिकारी, कर्मचारी संघटना बेमुदत संपावर जाणार आहे़ असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष माधव कात्नेश्वरकर, कार्याध्यक्ष अरुण पेडगावकर, सरचिटणीस मुक्रम रौफ, एम़ ए़ इनामदार, आऱ एम़ सोनुने, अरविंद देशमुख, के़ डब्ल्यू़ वाणी, एस़जी़ पवार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)