विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदी डॉ. श्याम सिरसाट यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:13 IST2020-10-28T16:10:53+5:302020-10-28T16:13:23+5:30
डॉ. सिरसाट हे शहरातील विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.

विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदी डॉ. श्याम सिरसाट यांची निवड
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. श्याम सिरसाट यांची नियुक्ती केली. डॉ. सिरसाट हे शहरातील विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.
विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक विद्यापीठात प्र-कुलगुरू या सवैधानिक पदाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी जुलै २०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार घेतला. यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यपालांनी प्रवीण वक्ते यांची प्रभारी प्र- कुलगुरू म्हणून नियुक्ती केली होती. यापूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात जवळपास दीड वर्ष डॉ. अशोक तेजनकर यांनी प्र- कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे.