शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Drought In Marathwada : मराठवाड्यात टँकरविना पर्याय नाही; ४० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:07 PM

गावांची तहान वाढली; १७८७ गावांत वणवण  

औरंगाबाद : चैत्र समाप्ती आणि वैशाखाच्या तोंडावर मराठवाड्यातील ग्रामीण भागाची तहान वाढली आहे. दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भयावह असल्यामुळे टँकरविना नागरिकांना कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मराठवाड्यातील सुमारे ४० लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या दशकातील सर्वाधिक त्रस्त असा दुष्काळ यावर्षी आहे. 

१७८७ गावे आणि ६२५ वाड्यांमध्ये २ हजार ४७० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. वैशाख महिन्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात दर आठवड्याला ७२ टँकर आणि ८३ हजार ९३४ नागरिकांची ३७ गावे आणि १४ वाड्यांची भर पडते आहे. विभागात सर्वाधिक औरंगाबाद जिल्हा दुष्काळात होरपळतो आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. १३७३ पैकी ६६३ गावे आणि २४९ वाड्यांवर ९८० टँकरचे पाणी द्यावे लागते आहे. १५ लाख ६ हजार ९७२   पाणी दिले आहेत. ७४७ टँकर ५४९ गावे आणि २५५ वाड्यांवर सुरू आहेत. त्याखालोखाल जालना जिल्ह्यातील ७ लाख ९९ हजार ७५३ नागरिकांना ४४६ टँकरने पाणीपुरवठा होतो असून, जिल्ह्यातील ३७६ गावे आणि ७८ वाड्या तहानल्या आहेत. 

विभागातील प्रकल्पात ३.७२ टक्केच पाणीविभागातील सर्व मिळून ८७२ प्रकल्पांत ३.७२ टक्के पिण्याचे पाणी शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ४ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३.१५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत ३.२१ टक्के, तर १३ गोदावरी नदीवरील बंधा-यांत ४.४७ टक्के पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील २४ बंधाºयांत एकही थेंब पाणी नाही. ३०४ दलघमी पाणीसाठा सध्या सर्व प्रकल्पांत आहे. 

जिल्हा        लोकसंख्या    गावे/वाड्या    टँकरऔरंगाबाद    १५०५९७२        ६६३/२४९        ९८०जालना        ७९९७५३        ३७६/७८        ४४६परभणी        ४७४४७        २१/५        ४२हिंगोली    ४२१७६        २०/८        ३४नांदेड        १११९१३        ४३/१८        ७३बीड        १०८५९४५        ५४९/२५५        ७४७लातूर        ८१२४९        २८/७        ३८उस्मानाबाद    २३८९४९        ८७/५        ११०एकूण        ३९१४४०४    १७८७/६२५    २४७० 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणी