मराठवाड्यातील दुष्काळी गावांना मदत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:00 AM2019-07-16T05:00:12+5:302019-07-16T05:00:26+5:30

मराठवाड्यातील ४७ तालुके व २७२ महसुली मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा तीन टप्प्यांमध्ये महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला.

Drought affected villages in Marathwada will be helpful | मराठवाड्यातील दुष्काळी गावांना मदत मिळणार

मराठवाड्यातील दुष्काळी गावांना मदत मिळणार

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४७ तालुके व २७२ महसुली मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर शासनाने पुन्हा तीन टप्प्यांमध्ये महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. त्यात काही गावांना अनुदान न देता केवळ दुष्काळी सवलती दिल्या. आता अशा उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांनाही दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, नाशिक, पुणे, अमरावती व नागपूर विभागाकडून दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या व किती निधी लागू शकेल, याचा अंदाज येण्यासाठी शासनाने उर्वरित गावांची यादी मागविली आहे.
उर्वरित तालुक्यांतील १५४० गावांमध्ये केवळ दुष्काळी सवलती लागु केल्या. मात्र, अनुदान दिले नाही. चार टप्प्यांमध्ये ७,0५७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता.

Web Title: Drought affected villages in Marathwada will be helpful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.