शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

आता राज्यात कोठूनही काढता येणार ‘लायसन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 4:50 PM

कोणत्याही आरटीओ कार्यालयात करता येणार शिकाऊ, पक्क्या परवान्यासाठी अर्ज

ठळक मुद्देमोटार वाहन अधिनियमात सुधारणा 

औरंगाबाद : मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ नुसार राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात शिकाऊ आणि पक्क्या परवान्यासाठी (लायसन्स) अर्ज करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत याची अंमलबजावणी केली जात आहे. लवकरच राज्यात सर्वत्र याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे.

नव्या कायद्यानुसार अनेक बदल करण्यात आले आहे. विशेषत: वाहन परवाना काढण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहे. आजवर परवाना काढण्यासाठी संबंधित आरटीओ कार्यालयाच्या परिक्षेत्रातील रहिवासी पत्त्याची गरज होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु ही अडचण आता लवकरच थांबणार आहे. काही वाहनधारक शिकाऊ परवाना एका आरटीओ कार्यालयातून काढतात आणि पक्क्या परवान्यासाठी अन्य कार्यालयांत अर्ज करतात. शिकाऊ परवाना देताना वय आणि निवासाचा पुरावा तपासण्याची जबाबदारी ही शिकाऊ परवाना देणा-या अधिका-याची आहे.

पक्का परवाना देणाºया अधिकाºयांवर ही जबाबदारी नसते. त्यामुळे कोणत्याही आरटीओ कार्यालयाने शिकाऊ परवाना दिलेल्या वाहनधारकांचे पक्क्या परवान्यासाठीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय मुंबई (पूर्व) आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. मोटार वाहन (सुधारणा) २०१९ नुसार शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठी राज्यात कोणत्याही कार्यालयाकडे अर्ज करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

आदेश येताच अंमलबजावणीअशा प्रकारची सुरुवात मुंबईत झाली आहे. मोटार वाहन (सुधारणा) अधिनियमासंदर्भात आदेश येताच आपल्याकडेही त्याची अंमलबजावणी केली जाईल; परंतु अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही. परवान्यावरील पत्ता बदल आजघडीला कोणत्याही कार्यालयात करता येतो, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी सांगितले.

असे काढा विनाएंजट परवानाआॅनलाईन सेवेद्वारे कोणत्याही एंजटशिवाय परवाना काढता येतो. परवान्यासाठी परिवहन/सारथी सर्व्हिस या नावाच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज भरून अपॉइंटमेंट घेता येते. त्यासाठी आॅनलाईन शुल्कही भरता येते. त्यानंतर अपॉइंटमेंटच्या दिवशी आरटीओ कार्यालयात जाऊन छायाचित्र काढणे अणि चाचणी देऊन परवाना प्राप्त करता येतो. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलर