शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अपघात प्रकरणी चालकास शिक्षा

By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST

हिंगोली : वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून बैलास धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने जीप चालकास २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

हिंगोली : वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून बैलास धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने जीप चालकास २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ. दि. जवळकार यांनी १३ मे रोजी हा निकाल दिला. सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ येथे २५ मार्च २००९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. शिवणी-आजेगाव रोडवर अनिल रमेश वाठोरे (रा. सिंदेफळ) याने आपल्या ताब्यातील काळी-पिवळी कमांडर जीप क्र. (एम. एच. ३८ बी-१३४३) हयगयीने व निष्काळजीपणे चालवून नारायण कान्होजी खताळ (रा. सिंदेफळ) यांच्या बैलास जोराची धडक दिली. या अपघातात बैलाचा पाय फ्रॅक्चर झाला. नारायण खताळ यांनी याबाबत दुसर्‍या दिवशी सेनगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी अनिल रमेश वाठोरे याच्याविरूद्ध कलम २७९, ४२६, भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. सरकारी पक्षाच्या वतीने जगन रामजी लाड, गंगाराम सखाराम लटांगळ, संदीप नारायण खताळ, सुर्यभान परसराम खताळ, भारत भानुदास लोणकर (सर्व रा.सिंदेफळ) यांच्यासह सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १३ मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ. दि. जवळकार यांनी खटल्याचा निकाल दिला. आरोपी अनिल रमेश वाठोरे (रा. सिंदेफळ) यास कलम २७९ भादंविनुसार १००० हजार रूपये दंड, कलम ४२६ भादंविनुसार १००० रूपये दंड अशा एकूण २००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. शारदा भट्ट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) हलगर्जीपणा कारणीभूत सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ येथे २००९ मध्ये घडला होता अपघात शिवणी ते आजेगाव रोडवर वाहन वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्यामुळे बैलास जखमी करण्यास चालक ठरला कारणीभूत अपघाताची पोलिसांत नोंद