दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:22 IST2019-03-26T23:22:18+5:302019-03-26T23:22:28+5:30
शेंद्रा एमआयडीसीतून कामावरुन गोलटगाव येथे घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
करमाड : शेंद्रा एमआयडीसीतून कामावरुन गोलटगाव येथे घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना ऊर्जा पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री ८ वाजता घडली. भाऊसाहेब नागोराव खंदारे (२०) असे मृताचे नाव आहे.
गोलटगाव येथे राहणारा भाऊसाहेब खंदारे हा शेंद्र्रा एमआयडीसीत सेक्युरिटीमध्ये कामाला आहे. तो कामावरुन रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एम. एच.२० बी जे ७५८०) घराकडे जात होता. औरंगाबाद-जालना मार्गावरील ऊर्जा पेट्रोल पंपाजवळ त्याच्या दुचाकीची पंपावर काम करणाऱ्या दिलीप चंद्रभान नरवडे याला धडक बसली. यात नरवडे जखमी झाले, तर चालक भाऊसाहेब खंदारे हे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान खंदारे याचा रविवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.