शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

१२ तासांच्या प्रयत्नानंतर सापडला चालकाचा मृतदेह

By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST

येणेगूर : उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी शिवारातील विहिरीत बुडालेल्या ट्रकचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल १२ तास दमछाक करावी लागली़

येणेगूर : उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी शिवारातील विहिरीत बुडालेल्या ट्रकचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल १२ तास दमछाक करावी लागली़ ७४ फूट पाण्याचा उपसा केल्यानंतर रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून चालकाचा मृतदेह बाहेर काढला़ येणेगूर येथील ट्रकचालक काशिनाथ जगताप व त्याचे सहकारी तन्वीर शेख, तुकाराम घुमटे हे तिघे महालिंगरायवाडी शिवारातील शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते़ तिघांनी विहिरीत उडी मारली़ मात्र, काशिनाथ जगताप हे वर आले नाहीत़ थोडावेळ वाट पाहून त्या दोघांनी काशिनाथची आई चंचला जगताप यांना माहिती दिली़ चंचला जगताप यांनी या घटनेची खबर येणेगूर दूरक्षेत्राला देताच सपोनि सोपान शिरसाट, पोहेकॉ गोरोबा कदम, कैलास चाफेकर आदींनी घटनास्थळी धाव घेवून प्रेत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, विहिरीत तब्बल ८० फूट पाणी असल्याने प्रेत त्यांच्या हाती लागले नाही़ त्यानंतर सातडेसात एचपीच्या पाच मोटारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बसवून पाणीउपसा सुरू करण्यात आला़ रात्री १० वाजेपर्यंत म्हणजे १२ तास सतत मोटारी सुरू ठेवून ७६ फूट पाणीउपसा करण्यात आला़ त्यानंतर उमरगा अग्निशमन दलाचे दोन जवान, दाळींब येथील चाकुरे, येणेगूरचे मदार भालके, सिराज मुन्शी, उत्तम सगर आदीनी विहिरीत उतरून सहा फूटाच्या पाण्यात मृतदेहाचा शोध घेवून ते बाहेर काढले़ येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ़ दिनकर जोशी यांनी मंगळवारी सकाळी शवविच्छेदन केले़ त्यानंतर काशिनाथ जगताप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मंडल अधिकारी प्रभाकर पाटील, पोहेकॉ गोरोबा कदम, कैलास चाफेकर, तलाठी प्रविण कोकणे, पोलिस पाटील शिवदर्शन पाटील, जाधव आदीनी परिश्रम घेतले़ कनिष्ठ अभियंता पी़एम़चव्हाण यांनी पाणी उपसा करण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवून प्रशासनाला मोठी मदत केली. (वार्ताहर)