शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
3
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
4
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
5
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
6
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
7
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
8
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
9
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
10
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
11
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
12
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
13
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
14
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
15
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
16
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
18
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
19
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
20
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
Daily Top 2Weekly Top 5

चालक विजय हाच मास्टर माइंड

By admin | Updated: June 23, 2014 00:30 IST

औरंगाबाद : सेंट झेव्हियर्स शिक्षणसंस्थेत चालक म्हणून काम करीत असलेला विजय सरोदे हाच ५२ लाख रुपये लुटीच्या कटाचा मास्टर माइंड निघाला.

औरंगाबाद : सेंट झेव्हियर्स शिक्षणसंस्थेत चालक म्हणून काम करीत असलेला विजय सरोदे हाच ५२ लाख रुपये लुटीच्या कटाचा मास्टर माइंड निघाला. तीन बायकांचा दादला असलेल्या विजयने तिन्ही घरांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी लुटीची व्यूहरचना आखून ती फत्ते करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्याचा डाव उधळला.
सेंट लॉरेन्स शाळेत व्यवस्थापक असलेले दीपक पुजारी, विजय सरोदे व कृष्णा देवडे हे तिघे जण शाळेत विविध शुल्कापोटी जमा झालेली रक्कम दोन- तीन दिवसांत एकदा मलकापूर बँकेत जमा करण्यासाठी जात असत. बँकेत भरली जाणारी भली मोठी रक्कम पाहून चालक विजय सरोदे याची नजर फिरली. विजयला तीन बायका आहेत. कारचालक म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनातून तिन्ही घरांचा संसार चालविणे त्याला कठीण झाले होते. त्यामुळे त्याने शाळेची रक्कम पळविण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने सिडकोच्या १३ व्या योजनेतील घराशेजारी राहणाऱ्या आरकेश पगारे व सत्यवान पगारे या दोन्ही भावांना रक्कम लुटण्यासाठी तयार केले. आरकेश व सत्यवान यांनासुद्धा ही कल्पना आवडली. त्या दोघा भावांनी त्यांचे मित्र पंडित ऊर्फ दाजी कांबळे, रमेश कांबळे व विनोद साळवे या तिघा जणांना या कटात सहभागी करून घेतले.
तीन दिवसांपूर्वी आरकेश, सत्यवान, रमेश, पंडित ऊर्फ दाजी व विनोद या पाच जणांनी सेंट लॉरेन्स शाळेपासून रावदेव हॉस्पिटलपर्यंत रेकी केली. शाळेतून रक्कम घेऊन निघालेली कार कुठे अडवायची. अडविण्यासाठी कारला धडक देऊन भांडणाची कुरापत कुणी काढायची. कार थांबल्यानंतर दुसऱ्या मोटारसायकलवरून तेथे कोणी पोहोचायचे, कारमधून पैशाची बॅग घेऊन कोणी पळून जायचे, अशी यथोचित व्यूहरचना आखण्यात आली. या व्यूहरचनेत विजय सरोदे या कारचालकाची भूमिका महत्त्वाची राहिली. पैसे लुटीच्या कटात विजयने शाळेचा दुसरा कर्मचारी कृष्णा देवडे यालाही पैशाचे आमिष दाखवून सहभागी करून घेतले.
रावदेव हॉस्पिटलच्या पुढे काही अंतरावर कार अडवून प्लॅटिना मोटारसायकलवरून आलेल्या आरकेश व पंडित ऊर्फ दाजी कांबळे यांनी भांडणाची कुरापत काढली. कारमधून विजय सरोदे, कृष्णा देवडे व दीपक पुजारी हे तिघे जण खाली उतरले. आरकेश व पंडित यांनी सुरुवातीला विजय, त्यानंतर दीपक पुजारी व कृष्णा देवडे यांना मारहाण केली. नियोजित कटाप्रमाणे तेथे निळ्या रंगाच्या करिश्मा मोटारसायकलवरून सत्यवान, रमेश व विनोद हे तिघे जण आले. त्यांनी कारमधून ५२ लाख रुपयांची बॅग घेतली व निघून गेले. कारमध्ये पैशाची बॅग नसल्याचे कृष्णा देवडे याने दीपक पुजारीला जाऊन सांगितले.
विशेष म्हणजे, ‘तो मी नव्हेच’ हे दाखविण्यासाठी आरकेश पगारे (झिपऱ्या) याने मोबाईलवरून ‘१००’ क्रमांक डायल करून येथे माझ्या मोटारसायकलला कारने धडक दिली आहे. पोलिसांना लवकर पाठवा, असा बनाव केला; पण त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक हा व्यस्त होता. पोलिसांनी आरकेश यास पकडून एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. तेथे त्याच्या मोबाईलमधून सर्व आरोपींचे मोबाईल क्रमांक घेतले.
तिघा जणांना पोलीस कोठडी
आरोपी आरकेश पगारे, चालक विजय सरोदे व कृष्णा देवडे या तिघा जणांना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरे आरोपी सत्यवान पगारे, पंडित ऊर्फ दाजी कांबळे व विनोद साळवे या तिघा जणांची ओळख परेड घ्यायची असल्यामुळे पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने २६ जूनपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
काल सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना ही घटना समजताच त्यांनी पोलीस भरतीमध्ये कार्यरत असलेले गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, शिवा ठाकरे, गौतम पातारे यांना एमआयडीसी सिडको ठाण्यात तात्काळ रवाना केले. तेथे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपींची वैयक्तिक माहिती गोळा करून त्यांना पकडण्यासाठी विविध पथके रवाना केली. निरीक्षक पातारे यांनी आरोपींचे मोबाईल ट्रेस करून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना त्या- त्या ठिकाणांवर जाण्याच्या सूचना केल्या. यात सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, एमआयडीसी सिडको ठाण्याचे अशोक सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक निरीक्षक उमेश थिटे, उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सुभाष खंडागळे, गोरख चव्हाण व वाघ यांच्या पथकांनी ४ आरोपी व पैशाची बॅग हस्तगत केली.