शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीकडे विद्यापीठाची पाठ; आदरातिथ्याकडेही दुर्लक्ष

By विजय सरवदे | Updated: October 31, 2022 19:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीतच या विद्यापीठाच्या प्रशासनाने मागासवर्ग आयोगाला वाईट वागणूक मिळाल्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजित बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने असहकार्य केल्यामुळे आयोगाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. तथापि, विद्यापीठ प्रशासनाच्या अशा आडमुठ्या भूमिकेबद्दल आयोगाकडून लवकरच समन्स बजावत येणार आहे.

विधी मंडळाच्या पूर्वपरवानगीने राज्यभरातील विद्यापीठांमध्ये एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाते का, या प्रवर्गातील किती पदे रिक्त आहेत. या प्रवर्गाच्या रिक्त पदांवर अन्य खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यात आली आहेत का अथवा तासिका तत्त्वावर अध्यापक नेमले आहेत का, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबद्दल अडचणी आदी बाबींचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात मागासवर्ग आयोगाची बैठक होती. आयोगाने दहा दिवसांपूर्वीच विद्यापीठाला यासंदर्भात पत्राद्वारे रीतसर कळविले होते. तरीही सोमवारी या बैठकीकडे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले फिरकले नाहीत. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्यासह अन्य संवैधानिक अधिकारी अथवा प्रशासनाकडून आयोगाच्या सदस्यांना चांगली वागणूक मिळाली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीतच या विद्यापीठाच्या प्रशासनाने मागासवर्ग आयोगाला वाईट वागणूक मिळाल्यामुळे सदस्यांनी संताप व्यक्त केला. विद्यापीठावर ढिसाळ कारभाराचा ठपका ठेवून आजची आढावा बैठक रद्द करत विद्यापीठातून काढता पाय घेतला. या आयोगाला न्यायालयीन दर्जा आहे. त्यानुसार विद्यापीठाला समन्स बजवायची, विद्यापीठाला पुन्हा एकदा संधी द्यायची का, याविषयी पुण्यात होणाऱ्या १० तारखेच्या बैठकीत आयोगाकडून निर्णय घेतला जाणार आहे. आयोगातील सदस्य ॲड. सगर किल्लारीकर, प्रा. गजानन खराटे, प्रा. निलिमा लखाटे (अमरावती), डॉ. गोविंद काळे (उस्मानाबाद) यापैकी प्रा. खराटे, प्रा. लखाटे आणि डॉ. काळे हे तिघे जण रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले होते. कुलगुरूंना महत्त्वाचे काम होते, तर विद्यापीठाने या सदस्यांंना रात्रीच बैठकीला कुलगुरू उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविणे गरजेचे होते, असे या सदस्यांनी सांगितले.

आरक्षणाचे धोरण आणि आयोगाची उपेक्षा राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य मागासवर्ग आयोगाने पहिल्यांदाच आरक्षणाबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. या विद्यापीठाकडून सहकार्याची सर्वाधिक अपेक्षा होती. मात्र, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले बैठकीला उपस्थित न राहून आरक्षणाचे धोरण आणि आयोगाची उपेक्षा करण्याचा प्रयत्न केला.- ॲड. सगर किल्लारीकर, सदस्य, मागासवर्ग आयोग

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद