शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ ग्रंथालय बनले शाश्वत ज्ञान स्त्रोत केंद्र; स्थापनेपासून ६,३१० संशोधकांनी मिळवली पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:29 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे.

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University) स्थापनेपासून ६ हजार ३१० संशोधकांनी संशोधन करून पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनाचे डिजिटलायझेशन करून त्याचे संवर्धन विद्यापीठ ग्रंथालय करत आहे. हार्डकाॅपीपासून सीडी-डीव्हीडी असा झालेला प्रवास आता ऑनलाइनपर्यंत येऊन थांबला आहे. हे संशोधन संशोधक, अभ्यासकांसाठी संदर्भासाठी उपलब्ध करून देताना वाड्मयचाैर्यालाही बऱ्यापैकी चाप लागला आहे.

ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे. या ग्रंथालयातील डिजिटलायझेशन राज्यातच नव्हे तर देशातही एक पाऊल पुढे आहे. संशोधक विद्यार्थ्यांना सीडी, डीव्हीडी, प्रबंध सादर करून ग्रंथालय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करणारी देशातील पहिली लायब्ररी असल्याचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर म्हणाले. आजपर्यंत झालेले प्रत्येक संशोधन ऑनलाइन उपलब्ध आहे. २०१२-१३ मध्ये तत्कालीन कुलगुरू डाॅ. विजय पांढरीपांडे यांच्या काळात सर्व प्रबंधांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन झाले.

मराठी- हिंदीला चोरी तपासण्याची प्रतीक्षावाङ्मयचौर्य शोधण्यासाठी युजीसीकडून मिळालेल्या साॅफ्टवेअरच्या वापरामुळे ‘कॉपी’ मारून आलेले प्रबंध परत केले जातात. योग्य दुरुस्तीनंतरच ते पुन्हा सादर होतात. पुन्हा सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करूनच ते स्वीकृत केले जातात. यात मराठी आणि हिंदी भाषेतील तपासणी होऊ शकत नसल्याने त्यासाठी नव्या साॅफ्टवेअरची मागणी केलेली आहे. तीही लवकरच पूर्ण होईल.

सीडी-डीव्हीडी लायब्ररीयूजीसीच्या निकषांप्रमाणे आणि शोधप्रबंधाच्या साच्यातच संशोधकांना प्रबंध तयार करून सीडी डीव्हीडीत जमा करावा लागतो. त्यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र सीडी डीव्हीडी लायब्ररी आहे. संदर्भानुसार त्या एका क्लिकवर त्या यंत्रातून बाहेर येतात, असे वीर म्हणाले.

सर्वात पहिला प्रबंध रसायनशास्त्र विषयातकमलाकर आनंद ठाकर यांनी रसायनशास्त्र विषयात स्टडीज् इन ऑक्सिजन हेट्रोसायकलिक्स हा प्रबंध जून १९६२ मध्ये ग्रंथालयात सादर केला. तो १५५ पानांचा टंकलिखित प्रबंध आहे. तेव्हापासून आजपर्यंत ६३१० जणांनी पीएच.डी.चे प्रबंध सादर केले

कोरोना काळात दिले १,७७६ ई प्रमाणपत्र१ जून २०२० ते १५ डिसेंबर २०२१ या कोरोनाचे निर्बंध होते. मात्र या काळात विद्यापीठातील ग्रंथालयात ऑनलाइन ८२१ प्रबंध व ९३५ अंतिम संशोधन आराखडे सादर झाले. त्यांची ऑनलाइन तपासणी करून ई प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर यांनी दिली.

सर्वाधिक संशोधनविषय -संशोधनप्राणीशास्त्र -६९७वनस्पतीशास्त्र -५११रसायनशास्त्र -४९३हिंदी -४४२मराठी -३९९अर्थशास्त्र -३७६इंग्रजी -३७०भौतिकशास्त्र -३१७

सर्वात कमी संशोधनकृषी -१आयुर्वेद -१विदेशी भाषा -१कीटकशास्त्र -१वैद्यकीय जीवशास्त्र -१वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र -१तत्त्वज्ञान -१स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग -१

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद