डॉक्टर महिलेची आत्महत्या; चौघांना कोठडी
By Admin | Updated: May 21, 2014 00:48 IST2014-05-21T00:45:13+5:302014-05-21T00:48:58+5:30
कळमनुरी : येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

डॉक्टर महिलेची आत्महत्या; चौघांना कोठडी
कळमनुरी : येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार आरोपींना न्यायालयाने ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कळमनुरी येथील न्यायालयाने सोमवारी हा आदेश दिला आहे. कळमनुरी शहरातील जिजाऊ नगरातील डॉ. सोनाली शिंदे यांनी सासरच्या छळास कंटाळून १५ मे रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयत विवाहितेचा पती डॉ. मुकेश शिंदे, सासरा लक्ष्मण शिंदे, सासू हेमलता शिंदे, दीर मयूर शिंदे या चार आरोपींविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी १९ मेपर्यंत आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या आरोपीस १९ मे रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या चारही आरोपींना ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे फौजदार विनायक लंबे यांनी सांगितले. आता या चारही आरोपींना परभणी शहरातील कारागृहात पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)