शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दिनीच आरोग्य सेवेतील डॉक्टर संपावर

By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST

औरंगाबाद : राज्यात आरोग्यसेवेतील डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनापासूनच संपावर जात आहेत.

औरंगाबाद : राज्यात आरोग्यसेवेतील डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनापासूनच संपावर जात आहेत. एक महिन्यात दुसऱ्यांदा डॉक्टर संपावर जात असल्यामुळे मंगळवारपासून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने (मॅग्मो) गेल्या महिन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर काळ्या फिती लावून काम केले, धरणे आणि निदर्शने आंदोलने केली. सर्व डॉक्टर संपावर जाताच शासनाने २ जून रोजी त्यांच्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा केली. त्यांनी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या दहा दिवसांत सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. शासनाने त्याबाबतचे लेखी पत्र ३ जून रोजी दिले होते. नंतर संघटनेने ४ जूनपासून संप मागे घेतला होता. २० जूनपर्यंत मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासनाशिवाय शासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे संघटनेच्या लक्षात आले. तेव्हा संघटनेने पुन्हा शासनास पत्र देऊन प्रश्न न सोडविल्यामुळे १ जुलैपासून पुन्हा वैद्यकीय अधिकारी संपावर जाणार असल्याचे कळविले. त्यानुसार मंगळवारपासून राज्यात एकही डॉक्टर कामावर हजर होणार नसल्याचे मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप काळे यांनी सांगितले. काळे म्हणाले की बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अत्यावश्यक बाळंतपण, अपघातासहित, तसेच एम.एल.सी. रुग्ण, पोस्टमार्टम, साथरोगविषयक कामकाज, तसेच सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या बैठकांना आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. प्रमुख मागण्या1२००९-१० मध्ये शासन सेवेत समाविष्ट झालेल्या डॉक्टरांना पूर्वलक्षी लाभ द्यावा.2अस्थायी ७८९ बी.ए.एम.एस. डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी व अस्थायी ३२ बी.डी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट ‘ब’मध्ये सेवा समाविष्ट करावी.3 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे.4बी.ए.एम.एस. डॉक्टरांना पदोन्नती द्यावी.5वरिष्ठ डॉक्टरांना आगाऊ वेतनवाढ द्यावी.बारा हजार डॉक्टर देणार सामूहिक राजीनामाआश्वासन देऊनही शासनाकडून ते पूर्ण न झाल्यामुळे मॅग्मो संघटनेचे राज्यातील सुमारे १२ हजार डॉक्टर काम बंद ठेवून राजीनामा देणार आहेत. मॅग्मोचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याकडे ते देण्यात येतील. त्यानंतर सर्व जिल्ह्यांतील डॉक्टर बेमुदत उपोषणही करतील. संपाचा फटका सामान्य रुग्णांना बसणार आहे. मात्र, संपाचा परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.