तुला माहिती आहे का, मी कोण आहे? मध्यरात्री जेवणावरून राजकीय कार्यकर्त्यांचा हॉटेलमध्ये राडा
By सुमित डोळे | Updated: February 6, 2025 19:31 IST2025-02-06T19:30:23+5:302025-02-06T19:31:40+5:30
कॅशियरवर प्राणघातक हल्ला, वेटरला देखील बेदम मारहाण

तुला माहिती आहे का, मी कोण आहे? मध्यरात्री जेवणावरून राजकीय कार्यकर्त्यांचा हॉटेलमध्ये राडा
छत्रपती संभाजीनगर : तुला माहिती आहे का, मी कोण आहे ? असे म्हणत एका राजकीय कार्यकर्त्याने गावगुंडासोबत मिळून हॉटेलवर हल्ला चढवला. मालकाला बेदम मारहाण करत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता पडेगावमधील दुबई हॉटेलवर ही घटना घडली. या राड्याप्रकरणी माऊली आमले, त्याचा भाऊ चिकुसह ७ ते ८ जणांवर छावणी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.
पडेगाव परिसरातील एका ढाब्यावर राजकीय कार्यकर्त्यांचा राडा; मालकावर हॉकीस्टीकने हल्ला, हॉटेलची देखील केली तोडफोड #chhatrapatisambhajinagar#crimenews#marathwadapic.twitter.com/6gw2KdYBcR
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 6, 2025
प्रल्हाद मोटे (३४, रा. नाईकनगर) हे सदर हॉटेलवर कॅशियर आहेत. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता हाॅटेल बंद केल्यावर आरोपींनी हॉटेलमध्ये जात जेवणाची मागणी केली. वेटरने जेवण पुरवण्यास नकार देताच आरोपींनी अन्य गावगुंडांना बोलावून घेतले. लाठ्याकाठ्या, हॉकीस्टीकने मोटे यांच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. वेटर कुमेल अब्बास, फुरकानला देखील मारहाण करुन जखमी केले. हॉटेलची तोडफोड केली. मोटे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी याप्रकरणी आमले सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.