घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले; पहिल्या पतीने जाऊन दुसऱ्याला बेदम झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 13:46 IST2021-11-12T13:44:04+5:302021-11-12T13:46:03+5:30
तिच्यासोबत दुसरे लग्न का केले? तू माझ्या मुलांना का सांभाळतो, असे विचारत शिवीगाळ करून हत्याराने वार केले

घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले; पहिल्या पतीने जाऊन दुसऱ्याला बेदम झोडपले
औरंगाबाद : सातारा परिसरात रेणुका हायस्कूलजवळून जाणाऱ्या प्रमोद रतनलाल पाटणी (वय ४५, रा. संतोषनगर, सातारा परिसर) यांना रामहरी गणेश कुटे (रा. मोरहिरा, ता. फुलंब्री) याच्यासह एकजणाने मारहाण केली.
रामहरी याने प्रमोद पाटणी यांना धमकावले की, तू माझी फारकत झालेली पत्नी अनिता हिच्यासोबत दुसरे लग्न का केले? तू माझ्या मुलांना का सांभाळतो, असे विचारत शिवीगाळ करून हत्याराने वार करीत जखमी केले. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रेयसीचा खून; आरोपीस पोलीस कोठडी
औरंगाबाद : प्रेयसी इंदुमती हिचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून तिचा गळा आवळून हत्या करणारा आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (२८, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश ह.मु. मुकुंदवाडी) याला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची न्यायालयास विनंती केली होती.