विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:23 IST2021-02-10T18:22:58+5:302021-02-10T18:23:37+5:30

Corona vaccine यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भिती न बाळगता लस घेण्याचे आवाहन केले

Divisional Commissioner Sunil Kendrakar administered the corona vaccine | विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली कोरोना लस

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली कोरोना लस

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरणानंतर नियमाप्रमाणे अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर केंद्रेकर रुग्णालयातून बाहेर पडले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी १२ वाजता सुनील केंद्रेकर दाखल झाले. ओळखपत्र दाखविल्यानंतर नोंदणी करून ते लसीकरण कक्षात दाखल झाले. यावेळी अधिपरिचारिका रेश्मा शेख यांनी केंद्रकर यांना लस दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य वैद्यकीय डॉ. नीता पाडळकर, डॉ. महेश लड्डा, डॉ. संतोष नाईकवाडे, डॉ. भारती नागरे, डॉ. अर्चना राणे, अधिपरिचारिका कुसूम भालेराव आदी उपस्थित होते.

लोकांनी स्विकार करावा म्हणून आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. लोक रांगा लावून लस घेतली, असा विश्वास सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Divisional Commissioner Sunil Kendrakar administered the corona vaccine