शहरं
Join us  
Trending Stories
1
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
2
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
3
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
4
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
5
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
6
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
7
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
8
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
9
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
10
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
11
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
12
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
13
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
14
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
15
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
16
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
17
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
18
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
19
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
20
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये ‘समाजकल्याण’च्या निधी वाटपात गोंधळ; जिल्हाधिकार्‍यांनी केले निधीचे पुनर्नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:48 IST

निधी वाटप करताना झालेली गडबड वेळीच लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निधीचे पुनर्नियोजन करून दलित वस्ती सुधार योजनेसाठी ३० कोटी आणि कृषी विभागामार्फत विहिरींच्या योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. 

ठळक मुद्देनिधी वाटपातील या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व कृषी विभागातील अधिकार्‍यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्वत:च्या अधिकारात समाजकल्याण विभागाकडून प्राप्त निधीचे पुनर्नियोजन केले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४२ कोटी आणि कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी अवघे १० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. निधी वाटप करताना झालेली गडबड वेळीच लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निधीचे पुनर्नियोजन करून दलित वस्ती सुधार योजनेसाठी ३० कोटी आणि कृषी विभागामार्फत विहिरींच्या योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. 

निधी वाटपातील या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व कृषी विभागातील अधिकार्‍यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अधिकारात समाजकल्याण विभागाकडून प्राप्त निधीचे पुनर्नियोजन केले.

जि.प.च्या समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजना व कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन्ही योजना प्राधान्याने अनुसूचित जाती तथा बौद्ध समाजाच्या नागरिकांसाठीच राबविल्या जातात. त्यामुळे राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत निधीचे वाटप करताना अनावधानाने दलित वस्ती सुधार योजनेच्या लेखाशीर्षवर कृषी विभागाच्या वाट्याचाही निधी वितरित झाला. तथापि, या आर्थिक वर्षासाठी जि.प.च्या समाजकल्याण विभागाने दलित वस्ती सुधार योजनेसाठी २० कोटी रुपये, तर कृषी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु चुकीने दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४२ कोटी आणि कृषी विभागाला अवघे १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. निधी वितरणात झालेली गडबड अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यामुळे वेळीच निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले.

यंदा कृषी विभागाचे ५०० विहिरींचे उद्दिष्टपूर्वी कृषी विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत विहिरींसाठी १ लाख रुपयांचे अुनदान दिले जात होते. मागील वर्षांपासून विहिरींसाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ५ जानेवारी २०१७ रोजी या योजनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, असे नामकरण झाले. यंदा प्राप्त १२ कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे ५०० लाभार्थ्यांना विहिरींसाठी अनुदान देण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट असल्याचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवा यांनी सांगितले. यासाठी २ हजार ६०० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, सध्या या अर्जांची छाननी सुरू आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून ३९३ शेतकर्‍यांना विहिरींचा लाभ देण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद