शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

दोन टक्के पाणीसाठ्यावरच जिल्ह्याची मदार

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण संख्या १४२ आहे. यापैकी केवळ ६४ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे. यातील काही प्रकल्पात गाळमिश्रीत पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही. भर पावसाळ्यात सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याची मागील तीन दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पांध्ये केवळ दोन टक्के साठा शिल्लक राहिल्याने आता पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरची संख्या ५५० वरजिल्ह्यात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येत आहे. सद्य स्थितीत ५६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. एकट्या आष्टी तालुक्यासाठी १२५ टँकर लावण्यात आलेले आहेत. बीड ९८, गेवराई ९३, वडवणी ६, शिरूर कासार ३९, पाटोदा २५, अंबाजोगाई ५, केज ५०, परळी १८, धारूर २१, माजलगाव ३७ एवढ्या टँकरद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाटोदा १, केज १५, आष्टी १७, शिरूर कासार ३, धारूर १५ याप्रमाणे ४९ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.आगामी काळात पाऊस पडला नाही तर भर पावसाळ्यात ८५० च्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)