माहुरात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली क्रीडा संकुलासाठी जागा
By Admin | Updated: March 20, 2016 23:46 IST2016-03-20T23:42:59+5:302016-03-20T23:46:49+5:30
श्रीक्षेत्र माहूर : वर्षानुवर्षे रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निकाली काढत

माहुरात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली क्रीडा संकुलासाठी जागा
श्रीक्षेत्र माहूर : वर्षानुवर्षे रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निकाली काढत क्रीडा संकुल बांधकामासाठी गायरान जमीन गट क्ऱ २ मधील ६ एकर १० गुंठे जमीन क्रीडा संकुल बांधकाम करण्यास ५ मार्च २०१६ रोजी मंजुरी दिल्योन आ़ प्रदीप नाईक यांच्यासह तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार व मान्यवरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरात भव्य क्रीडा संकुल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात जलतरणिका, व्यायामशाळा, रनिंग ट्रॅक, टेनिस, कराटे, बॉक्सिंगसह अद्ययावत क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉलचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी खा़ राजीव सातव, आ़ प्रदीप नाईक, नगराध्यक्षा गौतमी कांबळे, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, प्रा़राजेंद्र केशवे, सुरेश गिऱ्हे, यासह गेल्या दोन वर्षापासून माहूरचे तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांनी पाठपुरावा सुरू केला होता़ याप्रश्न लोकमतनेही वेळोवेळी क्रीडा संकुल व्हावे याबद्दल वृत्त प्रकाशित करून प्रकरण लावून धरले होते़ तसेच माहूर भेटीत जिल्हाधिकाऱ्यांना मान्यवरांनी भेट घेवून याबाबत लेखी निवेदन दिले होते़
त्या अनुषंगाने आ़ नाईक यांनी तहसीलदार डॉ़बिरादार यांच्यासमवेत वनविभागाच्या कार्यालयामागील गायरान जागेची पाहणी करून येथेच क्रीडा संकुल व्हावे यासाठी पत्र दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसीलदार यांना आदेश देवून भोगाधिकार मूल्यरहीत सारामाफीने जमिनीचा आगावू ताबा देण्यात येत असल्याचे विहित करून सदरील जागेचा क्रीडा संकुलासाठीच उपयोग करावा, सदरील जमीन दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरता येणार नसून सदरील जमिनीवर प्रत्येक ५० फुटामागे एक झाड लावावे व नगररचना विभागाचे नियम अटीनुसार यावर बांधकाम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत़ (वार्ताहर)