सोयामिल्क निर्मितीसाठी सरसावले जिल्हा प्रशासन
By Admin | Updated: December 9, 2015 23:56 IST2015-12-09T23:27:57+5:302015-12-09T23:56:27+5:30
बीड : दुष्काळावर मात व उद्योगांना चालना या उद्देशाने जिल्हयात सोया मिल्कच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे.

सोयामिल्क निर्मितीसाठी सरसावले जिल्हा प्रशासन
बीड : दुष्काळावर मात व उद्योगांना चालना या उद्देशाने जिल्हयात सोया मिल्कच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासाठी पुढाकार घेत बुधवारी अग्रणी बँक, कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. सर्वच तालुक्यांमध्ये उद्योग साकारण्याचे धोरण आहे. सोयाबीन पासून दूध तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला देखील चांगली मागणी राहील शिवाय भरघोस भावही मिळेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.
जिल्हा प्रशासन स्तरावर जिल्हयात सोया मिल्क व्यावसाय सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील बचतगटांना सामावून घेण्यात येणार आहे. शिवाय वैयक्तिक उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाकडून अर्थसहाय्य करण्यासाठी मदत करण्याचे धोरण आहे. परंतु अगोदर सांघिकरित्या हा उद्योग सुरू करण्याला प्राधान्य राहील.
तीसवर अर्ज दाखल
सोया मिल्कच्या उद्योगासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे ३० अर्ज आले आहेत. ७० ठिकाणी हा व्यवसाय सुरू करण्याचे विचाराधीन आहे. (प्रतिनिधी)