शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शुल्क भरण्याचा वाद; 'मनसे'कडून द जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये मुख्याध्यापकांच्या दालनाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:20 PM

मेस्टा, मेसा संघटनांकडून आरोपींना अटक व शासन करण्याची मागणी

ठळक मुद्देघटनेचा विविध शाळांकडून निषेध  

औरंगाबाद :  शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन लिंक न देण्यावरुन चर्चेत आलेल्या शहानुरमिया दर्गा परिसरातील द जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये प्राचार्यांच्या दालनाची गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी शाळा प्रशासनाने सातारा पोलीसांत तक्रार दिल्याची माहीती मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी दिली.

संतोष कुमार म्हणाले, शाळा व पालकांचा विषय दोघेही आपसात मिटवतील. मात्र, शाळेत पाल्य नसतांना पालक म्हणून प्रवेशासाठी भेटीला आलेल्या दोन कार्यकर्त्यांना कार्यालयात घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. त्यावेळी एक त्यांच्या सोबतचा व्यक्ती मोबाईलमध्ये शुटींग करत होता. ते घोषणाबाजी करुन बाहेर पडत नाही तोच इलेक्ट्राॅनीक मिडीयाही पोहचला. यावरुन हा प्लॅन करुन तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मी प्रचंड घाबरलो असून शाळेत माझ्याच दालनात असे हल्ल्याचे प्रकार घडत असतील तर विद्यार्थी पाठवायला पालकही घाबरतील. पालक मला वारंवार फोन करुन धिर देत असून  इतर संस्थाचालकही या घटनेचा निषेध करत आहेत. सध्या सातारा पोलीसांत आलो असुन तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. अचानक येवून ही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे येथील महिला शिक्षकांनी सांगितले. तर शाळेचा ऑनलाइन क्लास शुक्रवारी बंद राहिल अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली.

घटनेचा व्हिडीओ व्हायरलशाळा ऑनलाइन शिक्षणाचे शुल्क सक्तीने वसुल करत आहे. जे विद्यार्थी फीस भरत नाहीत त्यांना ऑनलाइन अभ्याससाठीच्या तासिकेची दिलेली लिंक बंद करण्यात आल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन दिसते. जैन इंटनॅशनल स्कुल मध्ये दुपारी दिडच्या सुमारास अॅडमिशनचे काम सांगून दोघे जण मुख्याध्यापकांच्या दालनात पोहचले. त्यांनी सुरुवातीला साहित्य खरेदी, शुल्क आकारणीची चर्चा केली. नंतर अचानक एक फोन येतो. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेबांचा विषय असो अशा घोषणा देत खुर्ची, टेबलावरील काच उचलून तोडफोड केली. त्यानंतर खिडकीची काच फोडून घोषणाबाजी करत तोडफोड करणारे निघून गेले.

निषेधासाठी ऑनलाईन शिक्षण शुक्रवारी बंदइंग्रजी शाळांच्या संघटना मेसाचे प्रल्हाद शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असुन या वर्षात हा पाचवा हल्ला आहे. मेसाकडून शुक्रवारी ऑनलाईन शिक्षण बंदची हाक शाळांना दिली गेली आहे. तर मेस्टाचे संजय तायडेपाटील यांनीही हल्लेखोरांना अटक व शासन होईपर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु करणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाMNSमनसेAurangabadऔरंगाबाद