रस्त्यात गाडी लावण्यावरून राडा; टिकटाॅक स्टारने काढला थेट गावठी कट्टा

By संतोष हिरेमठ | Updated: November 30, 2022 01:10 IST2022-11-30T01:09:39+5:302022-11-30T01:10:26+5:30

मारहाणीनंतर आरोपी गावठी कट्टा तेथेच टाकून पळून गेला

Dispute over parking on the road; The Tiktok star has taken a direct Gavathi Gun | रस्त्यात गाडी लावण्यावरून राडा; टिकटाॅक स्टारने काढला थेट गावठी कट्टा

रस्त्यात गाडी लावण्यावरून राडा; टिकटाॅक स्टारने काढला थेट गावठी कट्टा

औरंगाबाद : ‘तू गाडी रस्त्यात का लावली’ या कारणावरून एकाला मारहाण करताना टिकटाॅक स्टारने थेट गावठी कट्टा काढल्याची घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बायजीपुरा येथे घडली. मारहाण केल्यानंतर आरोपीने गावठी कट्टा घटनास्थळी सोडून पळ काढला.

याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
शेख समीर शेख सलीम (रा. बायजीपुरा) असे या आरोपीचे नाव आहे. सोेहेल खान रशीद खान (३४, रा. बायजीपुरा) असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी हे दोघे एकाच गल्लीतील राहणारे आहेत.

फिर्यादीचा भाऊ फईम शहा यांचे किरणा दुकान असून, येथे ‘तू गाडी रस्त्यात का लावली’ या कारणावरून मंगळवारी दुपारी आरोपी शेख समीर शेख सलीम याने वाद घालत फईम शहा यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करताना आरोपीने त्याच्या जवळचा गावठी कट्टा काढला. मात्र, हा गावठी कट्टा तेथेच सोडून पळ काढला.

याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक तांगडे हे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख समीर शेख सलीम हा टिकटाॅक स्टार आहे.

Web Title: Dispute over parking on the road; The Tiktok star has taken a direct Gavathi Gun