शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

निजामांच्या तावडीतून केली शिताफीने सुटका

By admin | Updated: September 17, 2015 00:31 IST

पद्माकर वाघ , नेकनूर मराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी

पद्माकर वाघ , नेकनूरमराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी स्वातंत्र्यसैनिकांना पकडले. यहां ठहरो असे फर्मान सोडत ते रजिस्टर आणण्यासाठी आत गेले तेव्हा त्यांच्या तावडीतून आम्ही मोठ्या शिताफीने सुटका करून घेतली...या आणि अशा इतर आठवणींना स्वातंत्र्यसैनिक प्रल्हादराव कदम यांनी बुधवारी उजाळा दिला.मराठवाडा मुक्तीसंग्रामात गुप्तहेराची भूमिका साकारणाऱ्या स्वा. सै. कदम यांनी ‘लोकमत’जवळ मुक्तीसंग्रामच्या लढ्यातील अनुभवाची पाने उलगडली. येळंबघाट (ता. बीड) येथील स्वा. सै. कदम आता थकले आहेत. मात्र, मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातील आठवणी सांगताना त्यांच्यातील करारीपणा जाणवत होता. ते म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग स्वामी, डॉ. कचेरीकर, भाऊराव पाटील, वामनराव वझे व इतरांनी खांद्याला खांदा लावून अनेक जोखमीची कामे केली.कासीम रझवी याच्या सभेत माझ्याकडे गुप्तहेर म्हणून जबाबदारी होती. ती सभा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झाली. निजाम स्टेट पाकिस्तानात विलीन व्हावे असा ठराव तेव्हा संमत करण्यात आला होता व बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे रक्ताने घेण्यात आले होते. हा सर्व प्रसंग आपण डोळ्याने पाहिला. त्याचे रिपोर्टिंग स्वामी रामानंद तीर्थ यांना व इतरांना दिले. त्यानंतर निजामांचा डाव उधळून लावता आला. स्वातंत्र्यसैनिक निष्ठेने लढले, त्यामुळे निजामांचा पाडाव करता आला, असे सांगायलाही कदम विसरले नाहीत.जांबियाचा आधारमुक्तीसंग्रामातील लढ्यात माझ्याकडे गुप्तहेर म्हणून काम सोपविले होते. त्यामुळे निजामांच्या बारीकसारीक हालचालींवर निरीक्षण ठेवावे लागत असे. महिनोंमहिने एकच ड्रेस अंगात असायचा. सोबत जांबिया मात्र नेहमीच ठेवत असे. त्यामुळे भीती वाटायची नाही, असे कदम यांनी सांगितले.प्रल्हादराव सांगत होते, त्यांच्या थोरल्या बंधूच्या निधनाचे पत्र १९४२ साली घरी आले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या पत्राची शहानिशा करण्यासाठी मी मांजरसुंबा, येडशी, बार्शी मार्गे पुण्याला गेलो. तेथे समजले की, भाऊ जिवंत आहे. पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यावर जीवात जीव आला. त्यावेळी पुण्यात भारत छोडो आंदोलनाचे तीन दिवसीय शिबीर होते. तेथे मी हजेरी लावली. तेंव्हापासून मराठवाडा मुक्तीसंग्रामात लढ्यात सहभागी झालो.