शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दसरा महोत्सव समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST

हिंगोली : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे.

हिंगोली : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली.अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी होते. याप्रसंगी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष तथा उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, सचिव तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये व्यापारी, उद्योजक, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत तहसीलदार कडवकर यांनी दसरा महोत्सवानिमित्त भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनीतील विविध स्टॉल्ससाठी १३ सप्टेंबर रोजी लिलाव प्रक्रिया घेण्यात येईल, असे सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी गगराणी यांच्या सूचनेवरून, दुकानदारांना डिपॉझिट भरल्याशिवाय लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही अशी अट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही प्रदर्शनी यंदा १३ दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे सांगितले. समितीमध्ये अनेकांची नावे असली तरी प्रत्यक्ष काम करताना कोणीच हजर राहत नसल्याची खंत व्यक्त करीत दसरा उत्सव म्हणजे हिंगोलीची शान असून ती वाढविण्यासाठी सर्वांनी उत्फूर्तपणे पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा तहसीलदार कडवकर यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे उपविभागीय अधिकारी तडवी यांनी सांगितले. बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, ज्येष्ठ पत्रकार शरद जयस्वाल, शांतीलाल जैैन, ओमप्रकाश बियाणी, विश्वास नायक भगवतीकर, सुनील मानका, बाबाराव घुगे, प्रकाश बांगर, वि.वा. हवालदार, गोविंद चौधरी, गोपाल दुबे, कमलकिशोर काबरा, सूर्यकांतअप्पा गोटरे, चंदु लव्हाळे, राजू उपाध्ये, निलेश बगडिया, पुरण शर्मा, गोपाल अग्रवाल, एस. एम. देशमुख, विनोद चितलांगे, अतुल बोरकर, दिनेश बगडिया, पंकज अग्रवाल, देवानंद वाबळे, संजय जयस्वाल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)