शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक नाईकवाडे निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 15:23 IST

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर बी.एस . नाईकवाडे यांना आज दुपारी मनपा आयुक्त डॉ .निपुण विनायक यांनी निलंबित केले. 

औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर बी.एस . नाईकवाडे यांना आज दुपारी मनपा आयुक्त डॉ .निपुण विनायक यांनी निलंबित केले. 

महापालिकेतील वादग्रस्त कारकीर्द असलेले प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर बी.एस . नाईकवाडे यांच्यावर शहरातील कुत्र्यांची नसबंदी, प्राणिसंग्रहालयातील विविध कामे आणि सफारी पार्क कामात निष्काळजीपणा केल्यामुळे मनपा आयुक्त डॉ .निपुण विनायक यांनी निलंबित केले. 

वादग्रस्त कारकीर्द नाईकवाडे महापालिकेत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात.  उद्यानात आलेला माकड अवैधरीत्या पकडून पिंजऱ्यात ठेवणे आदी अनेक कारनामे केल्याने ते चर्चेत होते. तसेच या आधी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात नाईकवाडे यांना तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी निलंबित केले होते. यावेळी तत्कालीन आयुक्तांनी त्यांचावर एक नव्हे दोन नव्हेतर तब्बल ९ आरोप ठेवले. यात हेमलकसा येथून रेणू आणि राजा या बिबट्याच्या जोडीला आणताना अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला. रेणू मादी गरोदर असतानाही तिची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. गॅस्ट्रो समजून चुकीचे औषधोपचार करण्यात आले. या निष्काळजीपणामुळे रेणू वेळेपूर्वीच प्रसूत झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. त्यांचीही योग्य निगा, काळजी न घेतल्याने ते ४८ तासांतच मरण पावले. या सर्व प्रकारामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या घटनांना प्राणिसंग्रहालय संचालक म्हणून आपण जबाबदार असल्याचे आयुक्तांनी निलंबन आदेशात म्हटले होते. याच वेळी त्यांची विभागीय चौकशीही करण्याचे आदेशित करण्यात आले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादsuspensionनिलंबनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद