सिंहासनावर 'दैवत'! छ. संभाजीनगरमधील 'या' मंदिरात घुमते शिवाजी महाराजांची विशेष आरती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 19, 2026 13:36 IST2026-02-19T13:34:56+5:302026-02-19T13:36:04+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवस्तीत आहे शिवरायांचे हे अनोखे मंदिर

Did You Know? A Unique Temple of Chhatrapati Shivaji Maharaj in the Heart of Chhatrapati Sambhajinagar | सिंहासनावर 'दैवत'! छ. संभाजीनगरमधील 'या' मंदिरात घुमते शिवाजी महाराजांची विशेष आरती

सिंहासनावर 'दैवत'! छ. संभाजीनगरमधील 'या' मंदिरात घुमते शिवाजी महाराजांची विशेष आरती

छत्रपती संभाजीनगर : ज्या राजाने रयतेसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण ‘जाणता राजा’ म्हणून पूजतो; पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शहराच्या मध्यवस्तीत एक असे ठिकाण आहे, जिथे शिवराय केवळ पुतळ्याच्या स्वरूपात नाही, तर प्रत्यक्ष ‘दैवत’ म्हणून मंदिरात विराजमान आहेत. हे मंदिर शिवप्रेमींच्या श्रद्धेचे प्रतीक बनले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कुठे आहे मंदिर?
निराला बाजार येथील मोतीवाला कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस न्यू समर्थनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. जीवन कला मंडळ, शिवराम प्रतिष्ठानने हे मंदिर बांधले.

कोणाची संकल्पना?
या मंदिराची संकल्पना पूर्णवाद वर्धिष्णु डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या निस्सीम भक्तीतून साकारली आहे. आधी नाशिक जिल्ह्यात व नंतर छत्रपती संभाजीनगरात मंदिर उभारण्यात आले. आता देशात अनेक ठिकाणी शिवरायांची मंदिरे आहेत.

सिंहासनावर मांडी घातलेली मूर्ती
शिवराम प्रतिष्ठानने बांधलेल्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर मांडी घालून बसलेली मूर्ती आहे. २००१ मध्ये या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. पंचधातूची ही मूर्ती शहरातील मूर्तिकार सुनील देवरे यांनी बनविली.

मंदिराला ऐतिहासिक पुराव्याची जोड
हे मंदिर केवळ भावनेपोटी उभारलेले नाही, तर त्याला ऐतिहासिक पुराव्यांची जोड आहे. इतिहास संशोधक प्रसाद तारे यांच्या अभ्यासानुसार, छत्रपती संभाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचे पहिले मंदिर उभारले होते. दक्षिण दिग्विजय मोहिमेत श्रीशैलम येथेही महाराजांच्या मंदिराचे संदर्भ आढळतात.
सतीश तांबोळी, सचिव, जीवन कला मंडळ

विष्णू पारनेरकर महाराज लिखित शिवरायांची आरती
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘आरती’. विष्णू महाराज पारनेरकर यांनी स्वतः रचलेली ही आरती जेव्हा मंदिरात घुमते, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येतो. आज हे मंदिर शिवरायांचे विचार आणि संस्कार देणारे ऊर्जाकेंद्र ठरत आहे.

Web Title : सिंहासन पर विराजमान छत्रपति शिवाजी महाराज: संभाजीनगर में अनूठा मंदिर।

Web Summary : संभाजीनगर में, एक अनोखा मंदिर छत्रपति शिवाजी महाराज को सिंहासन पर विराजमान करता है। शिवराम प्रतिष्ठान द्वारा निर्मित, मंदिर में बैठी हुई मूर्ति है और विष्णु महाराज पार्नेरकर द्वारा लिखित शिवराय की आरती गूंजती है, जो राजा की विरासत का सम्मान करती है।

Web Title : Chhatrapati Shivaji Maharaj Deified: Temple in Sambhajinagar Reveres the King.

Web Summary : In Sambhajinagar, a unique temple enshrines Chhatrapati Shivaji Maharaj on a throne. Built by Shivram Pratishthan, the temple features a seated idol and resonates with Shivraya's aarti written by Vishnu Maharaj Parnerkar, honoring the king's legacy.