शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 17:36 IST

Theft in Aurangabad : भरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ठळक मुद्देदेवळाई परिसरात फ्लॅट फोडून दागिन्यांसह रोकड पळविलीसीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पोलिसांनी हस्तगत केले.

औरंगाबाद : सेल्समनप्रमाणे पाठीवर बॅग, डोक्यावर टोपी आणि मास्क घालून अपार्टमेंटमध्ये येऊन तो रेकी करून गेला. त्यानंतर दीड तासाने कपडे बदलून आला आणि रुग्णालयात गेलेल्या एकाचा बंद फ्लॅट फोडून सोन्याच्या दोन अंगठ्या, २२ हजार रुपये रोख, एलईडी टीव्ही आणि मिक्सर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला. देवळाई परिसरातील क्रितिका रेसिडेन्सी येथे ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ दरम्यान चोरीची ही घटना झाली असून अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. ( Did Reiki before, changed clothes for an hour and snatched cash with jewelry )

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागात लिपिक असलेले शालिकराम मैनाजी चौधर (२९) यांची पत्नी प्रसूतीसाठी ९ सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात दाखल आहे. ११ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चौधर हे त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून रुग्णालयात गेले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना दाराला कुलूप दिसले नाही. आत जाऊन पाहिले असता दाराचे कुलूप बेसीनमध्ये ठेवलेले होते. बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोकेस आणि बेडचे ड्रावर उघडून त्यातील अनुक्रमे ७ ग्रॅम आणि ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, २२ हजार ४०० रुपयांची रोकड, उषा कंपनीचे मिक्सर, एलजी कंपनीची स्मार्ट एलईडी टीव्ही, असा सुमारे ६५ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक ठुबे, हवालदार राठोड, लुटे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. याप्रकरणी चौधर यांची तक्रार नोंदवून घेऊन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला. हवालदार काशीनाथ लुटे तपास करीत आहेत.

हेही वाचा - शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदभरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पोलिसांनी हस्तगत केले. यात तो स्पष्टपणे दिसत आहे. बळकट शरीरयष्टी असलेल्या या चोरट्याने डोक्यावर टोपी, मास्क घातलेला आहे. २ वाजून ३६ मिनिटांनी तो अपार्टमेंटमध्ये येऊन गेला. तेव्हा त्याने पांढरा हाफ बाह्याचा शर्ट, आणि पॅण्ट, पायात सॅण्डलसारखी चप्पल घातलेली होती. त्यानंतर ४ वाजताच्या सुमारास तो चाेरी करण्यासाठी आला तेव्हा त्याने कपडे बदलल्याचे दिसून येते. त्याने अंगावर निळा हाफ बाह्याचा टी शर्ट आणि बर्म्युडा पॅण्ट घातलेली होती.

हेही वाचा - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी