शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत चोरट्यांचे 'धुमधूम'; महिन्याला शंभरावर दुचाकी घेऊन चोरटे सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:03 IST

शहराच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरीला जात आहेत. 

ठळक मुद्देवाहनचोरीची तक्रार तात्काळ नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. पोलिसांची बहुतेक गस्त ही वाहनात बसून होते.

औरंगाबाद :  दुचाकी चोरी रोखण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. परिणामी, पोलिसांचा अंकुश नसलेले चोरटे शहरात दरमहा १०० हून अधिक  दुचाकी पळवीत असल्याची माहिती समोर आली. 

गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे शोध पथक कार्यरत आहे. या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्ह्याची उकल करणे आणि गुन्हे घडणार नाही यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले जाते. मात्र, गुन्हे शाखा ते डी.बी. पथकांकडून वर्षभरापासून विशेष अशी कामगिरी झाली नाही. परिणामी, घरफोडी, दुकान फोडण्याच्या घटनांसोबत वाहनचोरी वाढली आहे.  शहराच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरीला जात आहेत. 

दरमहा सरासरी १०० हून अधिक दुचाकी चोरी होत आहेत. वाहनचोरी का थांबत नाही, याविषयी एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हे रोखण्यासाठी गस्त हे एक सर्वोत्तम शस्त्र आहे. पोलिसांची बहुतेक गस्त ही वाहनात बसून होते. जोपर्यंत पोलीस त्यांच्या वाहनातून खाली उतरून संशयितांची चौकशी करणार नाही, तोपर्यंत गुन्हे कमी होत नाहीत. विशेषत: रात्रीची गस्त अत्यंत जबाबदारीने करणे गरजेचे असते. रात्री उशिरा पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी रोखून दोन प्रश्न  विचारले  पाहिजे. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यास त्या व्यक्तीला संशयित म्हणून अटक करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. वाहनचोरीची तक्रार तात्काळ नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात. तक्रार ठाण्यात दाखल झाल्यावर एका रजिस्टरमध्ये त्याच्या दुचाकीचा क्रमांक, नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घेऊन त्यांना गाडी शोधण्याचा सल्ला दिला जातो. नवीन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सहा ते आठ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनांची आता नोंद घेतली जात आहे. 

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक नाहीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी करणारे आणि दुचाकीचोर जामीन घेऊन जेलबाहेर आले आहेत. ते पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता जास्त असते. यामुळे प्रत्येक ठाणेदाराने रेकॉर्डरवरील गुन्हेगार, हिस्ट्रीसिटर यांना ठाण्यात बोलावून त्यांना ‘समज’ देणे आवश्यक असते. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे सुसाट फिरत आहेत.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीAurangabadऔरंगाबाद