धनगर समाजाच्या मोर्चाने जिल्हा दणाणला
By Admin | Updated: July 31, 2014 00:42 IST2014-07-31T00:07:46+5:302014-07-31T00:42:02+5:30
बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे.
धनगर समाजाच्या मोर्चाने जिल्हा दणाणला
बीड: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी बुधवारी गेवराई, धारुर, केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आंदोलनाचा लढा अधिकच व्यापक झाल्याचे दिसून येत आहे.
गेवराई तहसीलवर मोर्चा
आरक्षणप्रश्नी गेवराई येथे तहसील कार्यालयावर मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू देवकते यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी अॅड. लक्ष्मण पवार, गजानन काळे, अॅड. गणपत काकडे, जालींदर पिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजय दाभाडे, पं. स. सभापती पांडुरंग कोळेकर, किरण गावडे, परमेश्वर वाघमोडे, अॅड. राजू शिंदे, संजय लकडे, शिवराम शिनगारे, कृष्णा काळे, पप्पू कोळेकर, गिरधर चोपडे, बाबा पिसाळ, शांतीलाल पिसाळ उपस्थित होते. आरक्षणाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडवावा, अशी मागणी विष्णू देवकते यांनी केली. शेवटपर्यंत लढा देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
धारुर शहर घोषणांनी दणाणले
धारूरमध्ये मोर्चेकरांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते़ भाजपाचे आर.टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक करे, बालासाहेब जाधव, गणेश हाके, भागवत सरवदे, कल्याण आबूज, दत्ता धोतरे, महादेव तोंडे, माणिक लोखंडे, मोहन भोसले आदी सहभागी होते.
केजमध्ये मोर्चामध्ये शेकडो मेंढ्या
केजमध्ये समाजबांधव आक्रमक झालेले दिसून आले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शेकडो मेंढ्यांना सोबत घेऊन तहसीलवर मोर्चा काढला. भारत सोन्नर, बाळासाहेब गाढवे, सुभाष कोल्हे, भाजपाच्या संगीता ठोंबरे, हारून इनामदार, प्रकाश गुंड, दत्ता धस, सुरेंद्र तपसे, भाई मोहन गुंड, प्रा.हनुमंत भोसले, शिवसेनेचे रत्नाकर शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधींकडून)