धम्मभूमी नटली, आज येणार लाखो उपासक
By Admin | Updated: October 3, 2014 00:37 IST2014-10-03T00:36:55+5:302014-10-03T00:37:31+5:30
औरंगाबाद : अशोक विजयादशमीनिमित्त धम्मभूमी बुद्धलेणी येथे धम्मदीक्षेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

धम्मभूमी नटली, आज येणार लाखो उपासक
औरंगाबाद : अशोक विजयादशमीनिमित्त धम्मभूमी बुद्धलेणी येथे धम्मदीक्षेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मभूमीत सतत ३५ व्या वर्षी अशोक विजयादशमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बुद्धलेणी येथे दरवर्षी लाखो उपासक- उपासिका मराठवाड्यासह राज्यातील विविध शहरांतून येतात.
या वेळेस येणाऱ्या उपासक- उपासिकांसाठी परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला असून, रोषणाई करण्यात आल्याची माहिती भदन्त नागसेन यांनी दिली. या महोत्सवात उपस्थित राहून धम्मदेसना, धम्मदीक्षा देण्यासाठी अमेरिकेहून जागतिक कीर्तीचे भदन्त योगावचारा राहुला महास्थवीर हे आले आहेत.
सकाळी ५ ते ७ या वेळेत श्रामणेर संघ, भिक्खू संघाची ध्यानधारणा, ७.३० वाजता धम्म ध्वजारोहण होईल. क्रांतीचौकातून सकाळी ८.३० भिक्खू संघातर्फे रॅली काढण्यात येईल.
ही रॅली ११.३० वाजता बुद्धलेणी येथे विसर्जित होईल. त्यानंतर भिक्खू संघाचे भोजनदान होईल. मुख्य कार्यक्रमाला दुपारी प्रारंभ होईल. यानिमित्ताने किरण बोदडे यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त आयोजित श्रामणेर शिबिराची यावेळी सांगताही होणार आहे.
या परिसरात विविध सामाजिक संघटनाच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासूनच याठिकाणी विविध स्टॉल लागलेले आहेत.