शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादच्या भक्तांवर शिर्डीला जाताना काळाचा घाला; उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून ४ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:57 IST

छत्रपती संभाजीनगरात जखमींवर उपचार सुरू आहेत

गंगापूर : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात हैदराबाद येथील चार जण ठार, तर ११ जण जखमी झाल्याची घटना गंगापूर- वैजापूर मार्गावर शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तांबूळगोटा फाटा येथे बुधवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास घडली. वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (वय ६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१ वर्षे) व प्रेमलता श्यामशेट्टी (वय ५८ वर्षे), प्रसन्ना लक्ष्मी (वय ४५), अशी मृतांची नावे आहेत.

हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी (दि.१४) रोजी शिर्डी येथे बसद्वारे दर्शनाला आले होते. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन हे सर्व भाविक बुधवारी (दि.१५) सकाळी शिर्डी येथील जीप (एमएच १७ बीडी १८९७) द्वारे छत्रपती संभाजीनगर, वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा गंगापूरमार्गे शिर्डीला जात होते. रात्री १०:०० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे महालगावकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला (एमएच २० एफयू २६३३) या भाविकांच्या जीपने पाठीमागून धडक दिली.

या अपघातात वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी, अक्षिता गडकुनुरी व प्रेमलता श्यामशेट्टी हे गंभीर, तर रामा वसंत कापुरे (जीपचालक रा. शिर्डी), रामबाबू बज्जुरी (वय ४३ वर्षे), प्रणाली (वय १२), शेवंती (वय ३७), दीपक (वय ७), व्यंकय्या (वय ३८), प्रेमलता (वय ५०), शरण्या श्रीनिवास (वय १७), रमादेवी (वय ५५), कृष्णा मूर्ती (वय ६५), यामिनी (वय ३५ वर्षे, रा. सर्व रा. एलबीनगर, स्वरूपनगर, हैदराबाद, तेलंगणा) हे जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगरात जखमींवर उपचार सुरूदरम्यान, याचवेळी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोकॉ मेजर आर.आय. शेख व प्रवीण प्रधान हे महालगाव येथून बंदोबस्तावरून परत येत होते. त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी सर्व जखमींना पोलिसांच्या जीपमध्ये टाकून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी, अक्षिता गडकुनुरी व प्रेमलता श्यामशेट्टी यांना मयत घोषित केले. जखमींवर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. विशाल सूर्यवंशी, बाळू घोडके, शीतल उदावंत, मंदा त्रिभुवन, मुन्ना भोसले, प्रफुल्ल गायकवाड, आशाबाई आदींनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात