शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
3
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
4
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
5
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
6
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
7
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
8
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
9
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
10
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
11
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
12
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
13
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
14
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
15
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
16
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
17
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
18
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
19
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
20
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख घेऊनही पुन्हा ३० हजारांची मागणी; लाचखोर एसीबीच्या वकिलालाच एसीबीने पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:49 IST

न्यायालयातून लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकिलाच्या अटकेमुळे एकच खळबळ

छत्रपती संभाजीनगर : लाचेच्या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी दीड लाख रुपये घेऊनही पुन्हा ५० हजारांसाठी तगादा लावून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकील शरद बन्सी बांगर (४३) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्याच दालनातून त्यांना बुधवारी दुपारी जालना एसीबी पथकाने अटक करून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तक्रारदार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २२ मार्च २०२२ रोजी लाच घेतल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ते त्यात निर्दोष सुटले. मात्र, त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी ॲड. शरद बांगर यांनी त्यांना २ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दीड लाख रुपये तक्रारदाराने बांगरला दिले दिले होते. उर्वरित ५० हजारांसाठी बांगर त्यांना सातत्याने त्रास देत होते. गेल्या काही दिवसांपासून बांगरने सहायकाच्या क्रमांकावरून त्यासाठी तगादा लावला होता. यामुळे संतप्त सहायक फौजदाराने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली.

पडताळणीत निष्पन्न, मात्र पैसे स्वीकारले नाहीअधीक्षक कांगणे यांच्या आदेशावरून जालन्याचे एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्यात बांगरने ५० हजारांऐवजी तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सापळा लावण्यात आला. मात्र, बांगर कार्यालयात आले नाही. त्यांनी तत्काळ तक्रारदाराला तुम्ही आता तुमच्याच वकिलाला बोला, असे सांगितले. शिवाय, एका सहकाऱ्याकडे एसीबीने सापळा लावल्याचा संशय आल्याचे बोलून दाखवले. १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला. मात्र, बांगर यांनी लाच घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे लाच मागितल्याचे सबळ पुरावे असल्याने जाधवर, पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या पथकाने त्यांना बुधवारी अटक केली.

बांगर एसीबीचे सरकारी वकीलऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले बांगर सध्या छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वकील होते. त्यांच्या सर्व प्रकरणांत तेच सरकारी पक्षाकडून बाजू मांडत होते. त्यामुळे बांगर यांना एसीबीचे सापळे, त्यांचे शब्द, सापळ्यांच्या पद्धतीची माहिती होती. त्यामुळेच तक्रारदार पैसे आणून देतो, काही कमी करा, असे म्हणाला तेव्हाच बांगर यांना संशय आला व पैसे घेण्यापासून ते दूर गेले. मात्र, तोपर्यंत त्यांनी लाच मागितल्याचे पुरावे पथकाला मिळाले होते. ज्यांचे प्रतिनिधित्व केले, त्याच एसीबी पथकाला त्यांना अटक करावी लागली.

English
हिंदी सारांश
Web Title : ACB lawyer caught for bribery despite prior payment acceptance.

Web Summary : ACB lawyer Sharad Bangar arrested for demanding bribe after receiving ₹1.5 lakh. He pressured a retired policeman for ₹30,000 more to avoid appeal.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागadvocateवकिल