शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दोन सदस्य असूनही सभापतीपद राष्ट्रवादीकडे

By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST

बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़

बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़ दरम्यान, अनु़जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या सभापतीपदी विद्यमान उपसभापती व्यंकट पाण्डवे थडीसावळीकर यांचीच वर्णी लागून बढती मिळणार असे दिसते़बिलोली पंचायत समितीमध्ये आठ सदस्य असून एकाही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी निवडणूकपूर्व भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या छुपी युती आहे़ सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान रामतीर्थ जि़प़ आणि त्याच गटातील दोन पं़स़ गणासाठी भाजपाने उमेदवारच दिले नाहीत़ उर्वरित सहा जागेपैकी चार जागांवर भाजपने विजय खेचला़ भाजपचे जि़प़ सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व राक़ाँ़चे जि़प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांनी निवडणुकीपूर्वीच राजकीय खेळी करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले़ बिलोली पं़स़मध्ये मागच्या १३ वर्षांपासून युतीची सत्ता आहे़ बिलोलीच्या ग्रामीण भागात भाजपाचेच वर्चस्व आहे़ पं़स़च्या निवडणुकीनंतर भाजपा ४, राकाँ २ व काँगे्रसचे २ सदस्य आले़ भाजपा व राकाँची युती होवून भाजपचे सुभाष पाटील चिंचाळकर सभापती झाले़ आता उर्वरित अडीच वर्षाकरिता सभापती पद अनु़जाती (एस़सी़) प्रवर्गासाठी राखीव आहे़ परिणामी आठ सदस्यांत रामतीर्थ गटातील दोन्ही गणांतील उमेदवार पदासाठी दावेदार आहेत़ सरस्वतीबाई दासरवार व उपसभापती व्यंकट पाण्डवे यांच्यापैकी एक जण सभापतीपदी नक्कीच बसेल यात शंका नाही़ निवडणुकीपूर्वी व नंतर भाजपा व राकाँ यांच्यातील समझोतातून सभापती व उपसभापती पदासाठी वाटाघाटी झाल्या़ पहिल्यांदाच भाजपाचा सभापती व राकाँचा उपसभापती झाले़ आता उर्वरित अडीच वर्षाकरिता सभापती पद आपोआपच राष्ट्रवादीकडे जाणार, अन्य पक्षाकडे या पदासाठी उमेदवारच नाही तर चार सदस्यीय भाजपाकडे उपसभापतीपद जाईल़ उपसभापती व्यंकट पाण्डवे हे टाकळीकर यांचे कट्टर समर्थक आहेत व पूर्वाश्रमीक शिवसैनिक होते़ त्यामुळे भाजपाचा त्यांनाच हिरवा कंदील मिळेल असे दिसते़ (वार्ताहर)