शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:55 IST

राज्यातील प्रश्न सुटत असेल तर खुशाल छोटा पप्पू म्हणा

वाळूज ( औरंगाबाद) : राज्यातील मंत्रीच महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करीत असून गृहमंत्री कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकारमधील मंत्र्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्प बसल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही आदित्य म्हणाले. 

बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला प्रमूख पाहुणे म्हणून युवा नेते वरुण सरदेसाई, ज्येष्ठनेते विनोद घोसाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, आ.उदयसिंग राजपुत, जिल्हाप्रमूख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमूख बाळासाहेब गायकवाड, नंदकुमार घोडले आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असून देश-विदेशातील उद्योजक गुंतवणुक करण्यास तयार आहेत. मात्र,  राज्यातील घटनाबाह्य सरकारमुळे महत्वाचे प्रकल्प इतर राज्यात पळविले जात आहेत. एका राक्षसी व्यक्तीच्या महत्वकांक्षेमुळे राज्याचे वाटोळे होत असल्याची टीका आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेता केली. 

साडे सहा कोटी रुपयाची गुंतवणुक असणारा वेंदात प्रकल्प तसेच फोक्स वॅगन, टाटा एअर बस, बल्क ड्रग्स प्रकल्प हे हजारो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प घटनाबाह्य सरकारमुळेच राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी लगावला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत या दोघांचे नाव न घेता राज्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी व जनतेची दिशाभुल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मेळाव्याला उपजिल्हा प्रमूख बप्पा दळवी, माजी सरपंच सचिन गरड, सागर शिंदे, विजय सरकटे, ददत्तात्र्य वर्पे, मिरा पाटील, अनिता डहारिया आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

राज्यातील प्रश्न सुटत असेल तर खुशाल छोटा पप्पू म्हणाराज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे माझा सतत छोटा पप्पू म्हणून उल्लेख करीत आहेत. माझे नामकरण छोटा पप्पू केल्याने राज्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी व जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कृषी मंत्री सत्तार यांनी मला खुशाल छोटा पप्पू म्हणावे अशी उपरोधिक टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली. खा. सुप्रिया सुळे असो किंवा कोणतीही महिला असो आक्षेपार्ह भाषा बोलणाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबाद